म्हैसूर : काळ्या मिरचीच्या म्हणजेच मिऱ्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्याचे आवाहन येथे आंतरराष्ट्रीय संमेलनात करण्यात आले. इंटरनॅशनल पेपर कम्युनिटी अर्थात आयपीसीने या तीनदिवसीय संमेलनाचे आयोजन केले आहे. आयपीसीचे अध्यक्ष डॉ. ए. जयंतिलाक यांनी काळ्या मिरचीची गुणवत्ता, त्यावरील प्रक्रिया यावर एक योजना तयार करण्याचे आवाहन केले. उत्पादनाला चांगला दर हवा असेल तर गुणवत्तेत कसर करून चालणार नाही, असेही ते म्हणाले. काळी मिरची आयात करणारे देश आयातीबाबतचे नियम कठोर करत आहेत. कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे या नियमांची अंमलबजावणी करणे कठीण होत आहे. जगभरात मसाला पिकावर कीटकनाशक आणि अन्य रसायनांचा वापर वाढला आहे.
‘मिऱ्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन हवे’
By admin | Published: November 23, 2015 9:52 PM