Lokmat Money > बिझनेस न्यूज > सातत्यानं अपयश, तरीही मानली नाही हार; बिहारच्या पोरानं १२ महिन्यांत उभी केली ₹२४६३ कोटींची कंपनी

सातत्यानं अपयश, तरीही मानली नाही हार; बिहारच्या पोरानं १२ महिन्यांत उभी केली ₹२४६३ कोटींची कंपनी

यश हे वय पाहून मिळत नसतं. बिहारच्या २९ वर्षीय मिसबाह अश्रफचीही अशीच कहाणी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:34 AM2023-06-22T11:34:13+5:302023-06-22T11:35:28+5:30

यश हे वय पाहून मिळत नसतं. बिहारच्या २९ वर्षीय मिसबाह अश्रफचीही अशीच कहाणी आहे.

Persistence in failure yet not surrender A boy from Bihar misbah ashraf raised a investment company jar worth 2463 crore rupees in 12 months success story | सातत्यानं अपयश, तरीही मानली नाही हार; बिहारच्या पोरानं १२ महिन्यांत उभी केली ₹२४६३ कोटींची कंपनी

सातत्यानं अपयश, तरीही मानली नाही हार; बिहारच्या पोरानं १२ महिन्यांत उभी केली ₹२४६३ कोटींची कंपनी

मेहनत आणि जिद्द असेल तर आपण कोणतंही यश मिळवू शकतो. यश हे वय पाहून मिळत नसतं. बिहारच्या २९ वर्षीय मिसबाह अश्रफचीही अशीच कहाणी आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मिसबाह अश्रफला वारंवार अपयश आलं. परंतु त्यानं हार मानली नाही. मिसबाहच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आणि वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्याचा फोर्ब्सच्या 'फोर्ब्स ३० अंडर ३०' यादीत समावेश झाला. मिसबाहनं लहान वयातच मोठं यश मिळवलं. पदरी अपयश आल्यानंतरही हार न मानता त्यानं आज २४६३ कोटी रुपयांची फिनटेक कंपनी उभी केली.

कोण आहे मिसबाह अश्रफ?
मिसबाह अश्रफ हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे वडील शिक्षक होते. अपयशानंतरही प्रयत्न करत राहून जिद्द न सोडण्याचा धडा त्यानं वडिलांकडून घेतलाय. वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. मिसबाहचं सुरुवातीचं शिक्षणही नालंदामध्येच झालं. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मिसबाहची मोठी स्वप्नं होती. यामुळेच त्यांनी तरुण वयातच काम करायला सुरुवात केली. तो कॉलेजला गेला पण पहिल्याच वर्षात सोडलं. आपल्याला व्यवसायातच यश मिळू शकतं असा त्याचा विश्वास होता. आयआयटी दिल्लीतील एका मित्रासोबत त्यानं सप्टेंबर २०१३ मध्ये सिबोला हे सोशल पेमेंट व्हेन्चर सुरू केलं.

दोनदा अपयश पण...
मिसबाहचं हे व्हेन्चर लायसन्सच्या वादात अडकलं होतं. त्याला सरकारकडून पेमेंट लायसन्स मिळू शकलं नाही. एवढंच नाही तर त्यांच्यासमोर PhonePe, Paytm सारखे प्रतिस्पर्धी होते. वाट पाहण्याऐवजी मिसबाहनं पुढे जाण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यानं दुसरं व्हेन्चर सुरू केलं. यावेळी त्यानं फॅशन आणि ब्युटी प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. मार्सप्लेनं दोन राऊंडचं फंडिंगही मिळवलं. परंतु कोरोना महासाथीच्या काळात त्याचं मोठं नुकसान झालं. यानंतर त्यानं कंपनी FOXY ला विकली.

'जार'मधून मिळालं यश
मिसबाहनं २०२१ मध्ये जार हे तिसरं व्हेन्चर सुरू केलं. आज त्याच्या फिनटेक स्टार्टअप 'जार'ची देशातच नव्हे तर परदेशातही चर्चा होत आहे. सोन्याच्या गुंतवणुकीतून त्यानं जार सुरू केलं. मिसबाह अश्रफला २०२३ सालासाठी जाहीर करण्यात आलेल्या 'फोर्ब्स ३० अंडर ३०' यादीत स्थान मिळालं आहे. फोर्ब्सच्या या यादीत सहभागी होणारा मिसबाह हा बिहारमधील एकमेव तरुण आहे. त्याच्या स्टार्टअप जारद्वारे, तो लोकांना छोटी बचत सुरू करण्यास प्रवृत्त करत आहे. 

१२ महिन्यांत उभी केली कंपनी
मिसबाहनं कमी कालावधीत मोठं यश मिळवलं आहे. त्याच्या अॅपनं ११ मिलियन युझर्सचा टप्पा ओलांडलाय. फिनटेक फर्मनं ५८ मिलियन डॉलर्सची गुंतवणूकही मिळवलीये. स्टार्टअप सुरू झाल्यानंतर केवळ एका वर्षानंतर त्याला २२.६ कोटी डॉलर्सची गुंतवणूक मिळाली. यात त्याच्या कंपनीचं मूल्यांकन ३०० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे २४६३ कोटींवर गेलं.

Web Title: Persistence in failure yet not surrender A boy from Bihar misbah ashraf raised a investment company jar worth 2463 crore rupees in 12 months success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.