Join us

एका वर्षात २९ टक्के रिटर्न! दिवाळीपासून 'या' म्युच्युअल फंडातून सुरू करा गुंतवणुकीचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 2:12 PM

Investment Tips : लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड हा एक विशेष प्रकारचा इक्विटी फंड आहे. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतो.

Investment Tips : दिवाळीत अनेकजण चांगल्या कामाची सुरुवात करतात. या सणात अनेक चांगले मुहूर्त असल्याने लोक वर्षभर याची वाट पाहतात. दिवाळी हा सण गुंतवणुकीसाठी देखील अनुकूल मानला जातो. जर तुम्ही या शुभ मुहूर्तावर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लार्ज आणि मिड कॅप फंड हा एक उत्तम पर्याय असू शकतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) वेबसाइटनुसार, लार्ज आणि मिड कॅप फंडाने ऑक्टोबर २०२४ पर्यंत गेल्या एका वर्षात २९.२२% पर्यंत उत्कृष्ट परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडात शेअर मार्केटमधील जोखीमही बऱ्याच प्रमाणात कमी असते.

लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड हा एक विशेष प्रकारचा इक्विटी फंड आहे. हा फंड देशातील टॉप २०० कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. त्यात लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांचा समावेश आहे. यातील अनेक कंपन्या देशातील प्रमुख आणि उदयोन्मुख व्यवसायांतील असतात. या फंडात गुंतवणूक केल्यास प्युअर लार्ज कॅप फंडांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. कारण, यामध्ये स्थिरता आणि वाढीचा चांगला समतोल साधला जातो.

या फंडांनी वर्षात केलं श्रीमंतअसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) वेबसाइटनुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत, नऊ मोठ्या आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांनी एका वर्षात २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. क्वांट लार्ज आणि मिड कॅप फंडाने गेल्या १२ महिन्यांत २९ टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, बंधन कोअर इक्विटी फंड सुमारे २७ टक्के, एचडीएफसी लार्ज आणि मिड कॅप फंड २६ टक्के, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज आणि मिड कॅप फंड २६.०३ टक्के, यूटीआय लार्ज आणि मिड कॅप फंड २६.०२ टक्के, अ‍ॅक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटीज २५ टक्के. कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड २५.०४ टक्के, एडलवाईस लार्ज आणि मिड कॅप फंडाने २४.४९ टक्के परतावा दिला आहे. कॅनरा रोबेक्का इमर्जिंग इक्विटी फंडाने २४.३५ टक्के परतावा दिला आहे. तर मिरे अ‍ॅसेट लार्ज आणि मिडकॅप फंडाने २४ टक्के परतावा दिला आहे.

SIP द्वारे तुम्ही दीर्घकाळात चांगला परतावाजर तुम्ही दीर्घकाळ नियमित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे लार्ज आणि मिड कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. एसआयपीद्वारे इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने शेअर बाजारातील चढउतारांचा धोका कमी होतो. यामध्ये चक्रवाढीचा लाभ मिळतो. दीर्घकालीन गुंतवणुकीत बाजारातील नीचांकी आणि उच्च रिटर्नमध्ये सरासरी चांगला परतावा मिळतो.

(Disclaimer: यामध्ये म्युच्युअल फंडांच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजारदिवाळी 2024