Join us  

आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर विसरलात? फक्त 'या' स्टेप फॉलो करा २ मिनिटांत दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 5:06 PM

Mobile-Aadhar Link : आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर शोधण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तिथे काही स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल.

Mobile-Aadhar Link : सध्या आधार कार्डशिवाय तुमचं व्यावहारिक जीवनात पानही हलू शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खाजगी क्षेत्रापासून सरकारी व्यवस्थेपर्यंत सर्व ठिकाणी आधार हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. शाळेत प्रवेश घेण्यापासून ते घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यापर्यंत सर्वत्र आधार कार्डचा वापर केला जातो. सरकारी योजना तर आधारकार्डशिवाय मिळणे अशक्यच आहे.

आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणदावेर (UIDAI) जारी करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचे डॉक्युमेंट असल्याने आधार अपडेट ठेवणही आवश्यक आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असायला हवा. आधार कार्डची नोंदणी करताना मोबाईल नंबर टाकला जातो. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल, तर तो आधार कार्डसोबत अपडेट करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला OTP सारख्या सेवांचा लाभ घेता येईल.

अनेक मोबाईल असणाऱ्यांचं दुःखआपल्यापैकी अनेकजण एकापेक्षा जास्त मोबाईल वापरत असतील. अशा परिस्थितीत कुठला नंबर आधारशी लिंक केला आहे? हेच लोक विसरतात. जर तुम्हाला मोबाईल क्रमांक माहीत नसेल तर अनेक सरकारी आणि खाजगी सेवा वापरण्यासाठी लागणारा OTP मिळणे अवघड आहे. कारण, ओटीपी फक्त आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरच पाठवला जातो.

कसा शोधायचा आधारला लिंक असलेला मोबाईल नंबरतुमचा कोणता मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे हे जर विसरला असाल तर घाबरण्याची गरज नाही. यासाठी UIDAI ने एक सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. याचा वापर करुन तुम्ही दोन मिनिटांत मोबाईल क्रमांक मिळवू शकता.

या स्टेप फॉलो करा

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
  • येथे My Aadhaar सेक्शनवर क्लिक करा.
  • येथे Aadhaar Service पर्यायावर जा.
  • आधार सेवेमध्ये Verify an Aadhaar Number  वर क्लिक करा.
  • तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
  • Captcha कोड टाका.
  • आता Proceed to Verify वर क्लिक करा.
  • असे केल्याने, आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन नंबर दिसतील.
  • जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर नंबर येथे दिसणार नाहीत.
टॅग्स :आधार कार्डमोबाइल