Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF vs NPS, कुठल्या योजनेतील गुंतवणूक तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक करेल?

PPF vs NPS, कुठल्या योजनेतील गुंतवणूक तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक करेल?

PPF vs NPS : निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊन सरकारने PPF आणि NPS सारख्या योजना सुरू केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 02:05 PM2024-11-10T14:05:45+5:302024-11-10T14:06:26+5:30

PPF vs NPS : निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊन सरकारने PPF आणि NPS सारख्या योजना सुरू केल्या आहेत.

personal finance ppf vs nps best retirement investment option | PPF vs NPS, कुठल्या योजनेतील गुंतवणूक तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक करेल?

PPF vs NPS, कुठल्या योजनेतील गुंतवणूक तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक करेल?

PPF vs NPS : म्हातारपण सुखात जावं यासाठी तारुण्यात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. निवृत्तीसाठी बाजारात अनेक योजना उपलब्ध आहेत. यामध्ये २ लोकप्रिय पर्याय आहेत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS). दोन्ही योजनांचे वेगवेगळे फायदे आहेत. तुमच्या गरजानुसांर तुम्हाला योग्य स्किमची निवड करायची आहे. आज आपण दोन्ही योजनेंची सविस्तर माहिती घेऊ, म्हणजे तुमच्यासाठी कोणती योग्य हे निवडण्यास मदत होईल.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
पीपीएफ हा सुरक्षित गुंतवणूक आणि करमुक्त परतावा यासाठी सरकारने सुरू केलेली दीर्घकालीन योजना आहे. हा गुंतवणूकदारांसाठी योग्य असून जोखीमीशिवाय तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.

वैशिष्ट्ये
व्याज दर : सध्या PPF वर वार्षिक ७.१% व्याजदर आहे, जे सरकार दर तिमाहीत ठरवते.
कार्यकाळ : PPF योजना दीर्धकालीन असून याचा कालावधी १५ वर्षे आहे, तो तुम्ही नंतर ५ वर्षांपर्यंत वाढवू शकता.
गुंतवणुकीची मर्यादा : किमान ५०० रुपये ते कमाल दीड लाख रुपये तुम्ही वर्षात गुंतवू शकता.
कर लाभ : कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर दीड लाखांपर्यंत कर सूट उपलब्ध आहे. व्याज आणि परिपक्वता रक्कम देखील करमुक्त आहे.
सुरक्षा : ही एक सरकारी योजना आहे, त्यामुळे गुंतवणूकदाराला सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो.

कोण गुंतवणूक करू शकतो?
जोखमीशिवाय चांगला आणि करमुक्त परताव्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी पीपीएफ हा एक आदर्श पर्याय आहे.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS)
NPS ही सेवानिवृत्तीसाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरू केलेली पेन्शन योजना आहे. हा बाजाराशी निगडित गुंतवणूक पर्याय आहे, जो इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या संधी देतो.

वैशिष्ट्ये
व्याजदर : हा बाजाराशी जोडलेला असल्याने सतत बदलत राहतो. आतापर्यंतचा ऐतिहासिक परतावा दर ८-१०% आहे.
कार्यकाळ : गुंतवणूक ६० वर्षांसाठी करावी लागते, जी ७० वर्षांपर्यंत वाढवता येते.
गुंतवणुकीची मर्यादा : गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. परंतु, कर लाभ फक्त २ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
कर लाभ : कलम 80C अंतर्गत दीड लाख आणि कलम 80CCD(1B) अंतर्गत ५० हजार रुपयांची अतिरिक्त कर सूट उपलब्ध आहे.
पैसे काढणे : काही विशिष्ट परिस्थितीत आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे. सेवानिवृत्तीच्या वेळी ६०% रक्कम करमुक्त काढता येते, तर उर्वरित ४०% वार्षिकी खरेदी करण्यासाठी वापरावी लागते.
जोखीम : NPS गुंतवणूक शेअर बाजाराशी निगडीत आहे. त्यामुळे जास्त परतावा मिळण्यासोबत यात जोखीमही असते.

कोणी गुंतवणूक कराव?
ज्यांना जोखीम घेणे सोयीस्कर वाटते आणि ते निवृत्तीसाठी चांगला निधी तयार करू इच्छितात, ते यात गुंतवणूक करू शकतात.
 

Web Title: personal finance ppf vs nps best retirement investment option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.