Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा २५२ रूपये, मॅच्युरिटीवर मिळतील २० लाख

LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा २५२ रूपये, मॅच्युरिटीवर मिळतील २० लाख

Jeevan Labh Policy: मुलांच्या भविष्यासाठी दररोज २५२ रूपयांची गुंतवणूक असलेली ही स्कीम उत्तम ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 03:35 PM2022-08-01T15:35:32+5:302022-08-01T15:38:26+5:30

Jeevan Labh Policy: मुलांच्या भविष्यासाठी दररोज २५२ रूपयांची गुंतवणूक असलेली ही स्कीम उत्तम ठरू शकते.

personal finance report invest rs 252 daily policy lic you will get rs 20 lakh maturity know how to invest profit kids | LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा २५२ रूपये, मॅच्युरिटीवर मिळतील २० लाख

LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा २५२ रूपये, मॅच्युरिटीवर मिळतील २० लाख

Jeevan Labh Policy: सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीनं आपण एलआयसीकडे पाहतो. लोकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना गुंतवणूक करता यावी यासाठी एलआयसीनं अनेक प्लॅन्स आणले आहेत. एलआयसीच्या जीवन लाभ पॉलिसीमध्ये दररोज २५२ रूपये गुंतवून तुम्ही २० लाख रूपयांचा फंड जमा करू शकता. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर टॅक्स सूटदेखील मिळते.

या स्कीममध्ये कमीतकमी २ लाख रूपयांची विमा रक्कम मिळते. तसंच ८ ते ५९ वर्षांपर्यंत कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतात. यात गुंतवणूक करणाऱ्यांना मासिक, त्रैमासिक, सहा महिने आणि वार्षिक आधारावर प्रीमिअम देता येतील. यात तुम्हाला पैसे भरताना १५ दिवसांचा ग्रेस पीरिअडही देण्यात येईल. तर त्रैमालिक, सहा महिने आणि वर्षाचे पैसे भरताना गुंतवणूकदारांना ३० दिवसांचा ग्रेस पीरिअड मिळतो.

या प्लॅन अंतर्गत गुंतवणूकदार दोन प्रकारच्या टर्म प्लॅन अंतर्गत गुंतवणूक करू शकतात. १६ ते २५ वर्षांच्या दरम्यान तुम्ही कोणताही कालावधी निवडू शकता. त्यानुसार तुम्हाला १० ते १६ वर्षांचा प्रीमिअम भरावा लागेल. ही पॉलिसी घेतल्यास गुंतवणूकदारांना टॅक्स सूटही देण्यात येते.

कसे मिळतील २० लाख?
जर एखाद्या गुंतवणूकदाराला २० लाख रूपयांचा फंड जमा करायचा असेल तर त्याला दररोज २५१.७ रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. जीवन लाभ पॉलिसी अंतर्गत १६ वर्षांसाठी ही गुंतवणूक करावी लागेल. जर तुमचं अपत्य ९ वर्षांचं असेल तर त्यानुसार २५ व्या वर्षी त्याला २० लाख रूपये मिळतील. तुमच्या पाल्याच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी ही स्कीम उत्तम ठरू शकते.

Web Title: personal finance report invest rs 252 daily policy lic you will get rs 20 lakh maturity know how to invest profit kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.