Lokmat Money > बिझनेस न्यूज > १०,००० रुपयांच्या एसआयपीतून कमावले तब्बल १ कोटी रुपये; गणित समजून घ्या

१०,००० रुपयांच्या एसआयपीतून कमावले तब्बल १ कोटी रुपये; गणित समजून घ्या

Mutual Fund SIP : म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तुम्ही केलेली गुंतवणूक पूर्णपणे शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असते. याशिवाय म्युच्युअल फंड एसआयपीमधून मिळणाऱ्या रिटर्नवर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स देखील भरावा लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 05:27 PM2024-09-17T17:27:06+5:302024-09-17T17:28:03+5:30

Mutual Fund SIP : म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तुम्ही केलेली गुंतवणूक पूर्णपणे शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असते. याशिवाय म्युच्युअल फंड एसआयपीमधून मिळणाऱ्या रिटर्नवर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स देखील भरावा लागेल.

personal finance sip of rs 10 000 made rs 1crore in just 10 years | १०,००० रुपयांच्या एसआयपीतून कमावले तब्बल १ कोटी रुपये; गणित समजून घ्या

१०,००० रुपयांच्या एसआयपीतून कमावले तब्बल १ कोटी रुपये; गणित समजून घ्या

Mutual Fund SIP : कमी जोखमीत चांगले रिटर्न्स कमवण्याचा सोपा मार्ग म्हणजे एसआयपी. म्युच्युअल फंड एसआयपीने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. पण, म्युच्युअल फंड एसआयपी योजना निवडताना अतिशय हुशारीने निर्णय घेतला पाहिजे. जर तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंड SIP योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी वेळातही प्रचंड नफा मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती बनवले आहे.

उत्तम पोर्टफोलिओ, एक्सपेन्स रेश्यो, कमी जोखीम आणि म्युच्युअल फंड मार्केटमधील चांगल्या कामगिरीचा ट्रॅक रेकॉर्ड यामुळे योजनेला रेटिंग मिळते. म्युच्युअल फंडाचे रेटिंग मजबूत असेल तर त्या योजनेतील जोखीम कमी असते. जर रेटिंग चांगले असेल तर चांगले परतावा मिळण्याची शक्यता वाढते. त्यांच्यातील गुंतवणूकीचा खर्च किंवा खर्चाचे प्रमाण देखील 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. अशाच काही म्युच्युअल फंडाविषयी आपण माहिती घेणार आहोत.

Quant ELSS Tax Saver Fund

  • १० वर्षांमध्ये एसआयपी परतावा: वार्षिक २७%
  • मासिक SIP: रु १०,०००
  • अपफ्रंट इन्‍वेस्‍टमेंट : रु १ लाख
  • १० वर्षांत एकूण गुंतवणूक: १३ लाख रुपये 
  • 10 वर्षानंतर एसआयपी मूल्य : ६१,१९,९११ रुपये
  • १० वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: २४.४८% प्रतिवर्ष
  • १० वर्षात रु. १ लाख गुंतवणुकीचे मूल्य: रु ८,९३,२९७
  • पूर्ण परतावा: ७९३%
  • या फंडात तुम्ही किमान रु ५०0 एकरकमी आणि किमान रु ५०० SIP मध्ये गुंतवू शकता. या फंडाचा एक्सपेन्स रेश्यो केवळ ०.६५% आहे.

Nippon India Small Cap Fund

  • १० वर्षांमध्ये एसआयपी परतावा: वार्षिक २७.६२%
  • मासिक SIP: रु १०,०००
  • अपफ्रंट इन्‍वेस्‍टमेंट : रु १ लाख
  • १० वर्षांत एकूण गुंतवणूक: १३ लाख रुपये 
  • १० वर्षानंतर एसआयपीचे मूल्य: ६३,४३,२८४ रुपये
  • १० वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: २४.४६% प्रतिवर्ष
  • १० वर्षात रु. १ लाख गुंतवणुकीचे मूल्य: रु ८,९१,८६३
  • पूर्ण परतावा: ७९१%
  • या फंडात, तुम्ही किमान रु. ५००० एकरकमी आणि किमान SIP रु १०० गुंतवू शकता. त्याचा एक्सपेन्स रेश्यो देखील ०.६५% आहे.

SBI Small Cap Fund

  • १० वर्षांमध्ये SIP परतावा: २४.८२% प्रतिवर्ष
  • मासिक SIP: रु १०,००0
  • अपफ्रंट इन्‍वेस्‍टमेंट : रु १ लाख
  • १० वर्षांत एकूण गुंतवणूक: १३ लाख रुपये 
  • १० वर्षानंतर एसआयपी मूल्य: रु ५३,८६,०४०
  • १० वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: २४.०३% प्रतिवर्ष
  • १० वर्षात रु. १ लाख गुंतवणुकीचे मूल्य: रु ८,६१,५२४
  • पूर्ण परतावा: ७६१%
  • या फंडात, तुम्ही किमान रु. ५००० एकरकमी आणि किमान रु. ५०० च्या SIP मध्ये गुंतवू शकता. या फंडाचा एक्सपेन्स रेश्यो ०.६५% आहे.

Motilal Oswal Midcap Fund

  • १० वर्षांमध्ये SIP परतावा: वार्षिक २५.७७%
  • मासिक SIP: रु १०,०००
  • अपफ्रंट इनवेस्टमेंट : रु १ लाख
  • १० वर्षांत एकूण गुंतवणूक: १३ लाख रुपये 
  • १० वर्षानंतर एसआयपी मूल्य: रु ५६,५४,१५३
  • १० वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: वार्षिक २२.७७%
  • १० वर्षात रु. १ लाख गुंतवणुकीचे मूल्य: रु ७,७७,८९८
  • पूर्ण परतावा: ६७८%
  • या फंडात तुम्ही किमान रु ५०० एकरकमी आणि किमान रु ५०० SIP मध्ये गुंतवू शकता. या फंडाचा एक्सपेन्स रेश्यो आणखी कमी असून तो केवळ ०.५८% आहे.

Kotak Small Cap Fund

  • १० वर्षांमध्ये SIP परतावा: २४.५२% प्रतिवर्ष
  • मासिक SIP: रु १००००
  • अपफ्रन्ट इन्‍वेस्‍टमेंट : रु १ लाख
  • १० वर्षांत एकूण गुंतवणूक: १३ लाख रुपये 
  • १० वर्षानंतर एसआयपी मूल्य: रु ५२,९२,०२५
  • १० वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: २१.९०% प्रतिवर्ष
  • १० वर्षात रु. १ लाख गुंतवणुकीचे मूल्य: रु ७,२४,४९८
  • पूर्ण परतावा: ६२४%
  • तुम्ही या फंडात किमान १०० रुपये एकरकमी आणि किमान १०० रुपयांची एसआयपी गुंतवणूक करू शकता. याचा एक्‍सपेन्स रेश्‍यो केवळ ०.५८% आहे.

गेल्या 10 वर्षात 22.03 टक्के बंपर परतावा दिला
AMFI डेटानुसार, क्वांट फ्लेक्सी कॅप फंडाच्या थेट योजनेने गेल्या 10 वर्षांत 22.03 टक्के बंपर परतावा दिला आहे. त्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी या योजनेत 25,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,09,18,231 रुपये झाले असते.

कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की त्यात केलेली गुंतवणूक पूर्णपणे शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असते. याशिवाय म्युच्युअल फंड एसआयपीमधून मिळणाऱ्या रिटर्नवर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स देखील भरावा लागतो. कॅपिटल गेन टॅक्स भरल्यानंतर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम नक्कीच थोडी कमी असेल.

Web Title: personal finance sip of rs 10 000 made rs 1crore in just 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.