Join us

Petrol Diesel Price: मुंबईत पेट्रोल १२० रुपये लीटर! जाणून घ्या तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचा आजचा दर काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 9:13 AM

Petrol Diesel Price: तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. आज सलग ३७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Petrol Diesel Price: तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. आज सलग ३७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशभरात ६ एप्रिलपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. देशातील सर्वोत मोठी तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये प्रतिलीटर इतका आहे. तर डिझेलचा दर ९६.६७ रुपये प्रतिलीटर इतका आहे. तुम्ही फक्त एका SMS च्या माध्यमातून रोज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा लेटेस्ट जर जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत एका लीटर पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर १०४.७७ रुपये इतका आहे. दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त कोलकातामध्ये पेट्रोलचा आजचा दर ११५.१२ रुपये प्रतिलीटर इतका आहे. तर डिझेलचा दर ९९.८३ रुपये प्रतिलीटर इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपयाला विकलं जात आहे आणि डिझेल १००.९४ रुपये इतकं आहे. जागतिक स्तरावर इंधनाचा दर सरासरी १.३३ डॉलर म्हणजे १०२ रुपये प्रतिलीटरच्या स्तरावर आहे. भारतात पेट्रोलचा सरासरी दर ११३ रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ११२ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर पोहोचला आहे. 

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचा दरदिल्ली-पेट्रोल- १०५.४१ रुपये डिझेल- ९६.६७ रुपये

मुंबई-पेट्रोल- १२०.५१ रुपयेडिझेल- १०४.७७ रुपये

चेन्नई-पेट्रोल- ११०.८५ रुपयेडिझेल- १००.९४ रुपये

कोलकातापेट्रोल- ११५.१२ रुपयेडिझेल- ९९.८३ रुपये

लखनौपेट्रोल- १०५.२५ रुपयेडिझेल- ९६.८३ रुपये

जयपूरपेट्रोल-११८.०३ रुपयेडिझेल- १००.९२ रुपये

टॅग्स :पेट्रोलडिझेलतेल शुद्धिकरण प्रकल्प