वाहनधारकांना दिलासा : मध्यरात्रीपासून लागू झाले नवे दर
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या घसरणीचा ट्रेंड कायम राहिल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेल या दोन्ही इंधनाच्या किमतीमध्ये अनुक्रमे २ रुपये ४२ पैसे व सव्वा दोन रुपये इतकी कपात केली आहे.
ही दरकपात स्थानिक दर वगळून असल्याने प्रत्यक्षात इंधनाचे दर विभागनिहाय ३० पैसे ते ६० पैसे अधिक स्वस्त होणार आहेत. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ५० डॉलरपेक्षा कमी झाल्या असून, त्याच पातळीवर काहीशा स्थिरावलेल्या आहेत. त्यामुळे कपात अपरिहार्य मानली जात आहे. आॅगस्ट २०१४पासून पेट्रोलच्या दरात झालेली ही सलग दहावी दरकपात आहे. तर आॅक्टोबर २०१४मध्ये डिझेल सरकारी दरातून नियंत्रणमुक्त झाल्यानंतर त्या दरात झालेली ही सहावी दरकपात आहे. दोन्ही इंधनात नव्या वर्षात झालेली ही तिसरी दरकपात आहे. (प्रतिनिधी)
आणखी घट शक्य
कच्चा तेलाच्या किमती घसरल्याने सरकारने दोन्ही इंधनावर उत्पादन शुल्क चार वेळा वाढवले आहे. यामुळे दोन्ही इंधनावर
साडे सात रुपये कर लागू आहे. हा कर लागू झाला नसता तर दोन्ही इंधनाच्या किमती आणखी किमान साडे सात रुपयांनी स्वस्त झाल्या असत्या.
पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त
तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेल या दोन्ही इंधनाच्या किमतीमध्ये अनुक्रमे २ रुपये ४२ पैसे व सव्वा दोन रुपये इतकी कपात केली आहे.
By admin | Published: February 4, 2015 03:15 AM2015-02-04T03:15:27+5:302015-02-04T03:15:27+5:30