Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Rate Today : सलग चौथ्या दिवशी इंधनदरवाढ; मुंबईत पेट्रोल ९५ रुपये, डिझेलही सर्वोच्च पातळीवर

Petrol-Diesel Rate Today : सलग चौथ्या दिवशी इंधनदरवाढ; मुंबईत पेट्रोल ९५ रुपये, डिझेलही सर्वोच्च पातळीवर

तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केल्याने गेल्या आठवडाभरापासून तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. सन २०२१ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत १६ वेळा वाढ केली आहे. सलग चौथ्या दिवशी लीटरमागे पेट्रोल दरात २९ पैसे आणि डिझेल दरात ३८ पैसे वाढ करण्यात आली आहे. (Petrol-Diesel Rate Today)

By देवेश फडके | Published: February 12, 2021 09:14 AM2021-02-12T09:14:39+5:302021-02-12T09:17:07+5:30

तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केल्याने गेल्या आठवडाभरापासून तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. सन २०२१ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत १६ वेळा वाढ केली आहे. सलग चौथ्या दिवशी लीटरमागे पेट्रोल दरात २९ पैसे आणि डिझेल दरात ३८ पैसे वाढ करण्यात आली आहे. (Petrol-Diesel Rate Today)

petrol and diesel price hike again today | Petrol-Diesel Rate Today : सलग चौथ्या दिवशी इंधनदरवाढ; मुंबईत पेट्रोल ९५ रुपये, डिझेलही सर्वोच्च पातळीवर

Petrol-Diesel Rate Today : सलग चौथ्या दिवशी इंधनदरवाढ; मुंबईत पेट्रोल ९५ रुपये, डिझेलही सर्वोच्च पातळीवर

Highlightsपेट्रोल डिझेल दरात सलग चौथ्या दिवशी वाढदिल्लीत पेट्रोल, तर मुंबईत डिझेल दराचा उच्चांकजागतिक स्तरावरील कच्च्या तेलाची किंमत वधारल्याचा परिणाम

मुंबई : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोल ९५ रुपयांजवळ पोहोचले असून, राजधानी दिल्लीत पेट्रोल दर सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.  (petrol and diesel price hike again today)

तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केल्याने गेल्या आठवडाभरापासून तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. सन २०२१ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत १६ वेळा वाढ केली आहे. सलग चौथ्या दिवशी लीटरमागे पेट्रोल दरात २९ पैसे आणि डिझेल दरात ३८ पैसे वाढ करण्यात आली आहे. (Petrol-Diesel Rate Today)

गेल्या १० महिन्यात पेट्रोलमध्ये १८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेल १५ रुपयांनी महागले आहे. इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा आढावा घेतला जाऊन पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली जाते. 

मुंबईत कांद्याचा तुटवडा कायम; मागणीपेक्षा आवक कमी

मुंबई, दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर

दरवाढीनंतर आज मुंबईत लीटरमागे पेट्रोलचा दर ९४.६४ रुपये झाला आहे. तर एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.३२ रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलने सर्वोच्च पातळी गाठली असून, लीटरचा दर ८८.१४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७८.३८ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९०.४४ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८३.५२ रुपये भाव आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर ८९.४४ रुपये झाले आहे. डिझेलचा दर ८१.९६ रुपये झाला आहे.

सन २०२१ मध्ये पेट्रोलच्या दरात ४.२४ आणि डिझेलच्या दरात ४.१५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसेदत दरवाढीचे सर्मथन केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीवर केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. तसेच सरकार हस्तक्षेप करत नसल्यामळे सामान्य नागरिकांमध्येही संतापाची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संकटामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना इंधन दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आता महागाईचा भडकाही उडेल, असे सांगितले जात आहे. 

Web Title: petrol and diesel price hike again today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.