नवी दिल्ली : देशातील इंधनाच्या दरात सप्ताहामध्ये तिसऱ्या वेळी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये लिटरमागे २५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर ९२ रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत, तर डिझेलच्या दराने नवीन उच्चांक गाठला आहे.
सरकारी इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांमध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली आहे. या सप्ताहात याआधी १८ आणि १९ रोजी या दोन्ही इंधनांच्या दरामध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली गेली होती. याचाच अर्थ या सप्ताहामध्ये इंधनाच्या दरांमध्ये लिटरमागे ७५ पैशांनी वाढ झाली आहे.
या दरवाढीमुळे डिझेलच्या किमती आता उच्चांकी गेल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये आता पेट्रोलचे दर ९२.०४ रुपये असे झाले आहेत. सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या किमतींमुळे सरकारने इंधनावरील अबकारी करामध्ये कपात करण्याची मागणी होत आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दराने गाठला उच्चांक
सरकारी इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांमध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली आहे. या सप्ताहात याआधी १८ आणि १९ रोजी या दोन्ही इंधनांच्या दरामध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली गेली होती.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 06:15 AM2021-01-23T06:15:54+5:302021-01-23T06:16:20+5:30