नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोलचे दर लिटरमागे २५ रुपयांनी कमी करणे शक्य आहे. पण
सरकार तसे न करता सामान्य ग्राहकांचे अन्याय्यपणे शोषण करीतच राहील, असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी बुधवारी केला.
चिदम्बरम यांनी टष्ट्वीटरवर लिहिले की, खनिज तेलाचे दर कमी झाल्याने सरकारची पेट्रोलच्या एका लिटरमागे १५ रुपयांची बचत होते. यामुळे पेट्रोलचे दर लिटरमागे २५ रुपयांनी कमी करणे शक्य आहे. पण तसे न करता सरकार लोकांची पसवणूक करेल, असेच चित्र आहे. सरकार पेट्रोलचे दर कमी करण्याऐवजी त्यावर लिटरमागे १० रुपयांचे कर लावते आणि मग दर एक-दोन रुपयांनी कमी करून ग्राहकांची फसवणूक करते.
पेट्रोल २५ रुपये स्वस्त होणे शक्य - पी. चिदम्बरम
खनिज तेलाचे दर कमी झाल्याने सरकारची पेट्रोलच्या एका लिटरमागे १५ रुपयांची बचत होते.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:31 AM2018-05-24T00:31:23+5:302018-05-24T00:31:23+5:30