नवी दिल्ली - देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढतच चालले आहेत. याचा परिणाम थैट दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होताना दिसत आहे. आज पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढले. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतींत लिटरमागे 35 पैशांची वाढ झाली आहे. (Petrol costlier by 35 paise each know petrol and diesel prices today)
आज झालेल्या पेट्रोल दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 99.16 रुपयांवर पोहोचले आहेत. यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे, आज डिझेलच्या दरात करसल्याही प्रकारची वाढ झाली नाही. दिल्लीत डिझेल 89.18 रुपये प्रती लीटर विकले जात आहे.
पेट्रोल डिझेलेचे महत्वाच्या शहरांतील दर -
शहर पेट्रोल डीजल
नवी दिल्ली - 99.16 89.18
मुंबई - 105.25 96.72
कोलकाता - 98.99 92.03
चेन्नई - 100.15 93.72
बेंगळुरू - 102.46 94.54
देशात महागाईचा भडका! साबण-शॅम्पूच्या किंमती पक्त 3 महिन्यांत 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या!
पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील टॅक्सने केंद्राची बंपर कमाई -
आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील कस्टम आणि एक्साइज ड्यूटीच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या कमाईत 56 टक्क्यांहूनही अधिकची वाढ झाली आहे. तसेच, इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमाने सरकारची कमाई जवळपास 2.88 लाख कोटी रुपये एवढी झाली आहे.
2020-21 मध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील इंपोर्टवर 37 हजार 806 कोटी रुपयांची कस्टम ड्यूटी वसूल केली गेली. तर सेंट्रल एक्साइज ड्यूटीच्या माध्यमाने 4.13 लाख कोटी रुपयांची कमाई झाली. तर पेट्रोलियम पदार्थांवरील इंपोर्टवर सीमा शुल्क म्हणून 46 हजार कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
दोन महिन्यात 8.76 रुपयांनी महागल पेट्रोल -
राजधानी दिल्लीत 1 मेरोजी 90.40 रुपये प्रति लिटरवर असलेले पेट्रोल आता 99.16 रुपये प्रती लीटरवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या 60 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 8.76 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. याच प्रकारे राजधानीत डिझेलचे दरही गेल्या दोन महिन्यात 8.45 रुपये प्रति लिटरने वाढून 89.18 रुपयांवर पोहोचले आहेत.