नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तेल कंपन्यांनी बदल केले असून, १ आॅक्टोबरपासून पेट्रोलचे दर एका लीटरमागे ३६ पैशांनी वाढविण्यात आले आहेत. डिझेल लीटरमागे किरकोळ म्हणजे ७ पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलच्या भावांत सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून, डिझेलचे दर दुसऱ्यांदा कमी करण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पेट्रोल ३६ पैशांनी महागले, डिझेल ७ पैशांनी स्वस्त
By admin | Published: October 01, 2016 3:20 AM