Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price : मध्य प्रदेशातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल 121 रुपये प्रति लीटर, डिझेलनंही ओलांडला 110 रुपयांचा टप्पा

Petrol Diesel Price : मध्य प्रदेशातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल 121 रुपये प्रति लीटर, डिझेलनंही ओलांडला 110 रुपयांचा टप्पा

येणाऱ्या नव्या वर्षात पेट्रोलचा दर 150 रुपये लीटर तर डिझेलचा दर 140 रुपये लीटर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. करामधील भरमसाट वाढ आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी याचा हा परिणाम आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 07:23 PM2021-10-30T19:23:37+5:302021-10-30T19:24:35+5:30

येणाऱ्या नव्या वर्षात पेट्रोलचा दर 150 रुपये लीटर तर डिझेलचा दर 140 रुपये लीटर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. करामधील भरमसाट वाढ आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी याचा हा परिणाम आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.

Petrol crosses rs 121 per liter in border district of madhya pradesh and diesel price exceeds rs 110 | Petrol Diesel Price : मध्य प्रदेशातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल 121 रुपये प्रति लीटर, डिझेलनंही ओलांडला 110 रुपयांचा टप्पा

Petrol Diesel Price : मध्य प्रदेशातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल 121 रुपये प्रति लीटर, डिझेलनंही ओलांडला 110 रुपयांचा टप्पा

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सीमावर्ती जिल्हा अनूपपूर (Anuppur District) येथे शनिवारी पहिल्यांदाच पेट्रोलच्या किमती 121 रुपये प्रति लीटरवर पोहोचल्या आहेत. तर डिझेलचा (Diesel) दर 110 रुपयांवर पोहोचला आहे. उद्योग जगतातील (Industry) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनूपपूर येते पेट्रोलचा दर 121.13 रुपये प्रति लीटर, तर डिझेलचा दर 110.29 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. याच बरोबर बालाघाट मध्ये पेट्रोलचा दर 120 रुपयांच्या पुढे गेले आहे.

छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या अनुपपूरमधील बिजुरी येथील पेट्रोल पंप चालक अभिषेक जायसवाल यांनी सांगितले, की, गेल्या 24 तासांत पेट्रोलच्या दरात ३६ पैसे, तर डिझेलच्या दरात ३७ पैसे प्रति लिटरने वाढ झाली. जयसवाल म्हणाले, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या जबलपूर ऑईल डेपोतून पेट्रोल आणले जाते, यामुळे वाहतूक खर्च जास्त असल्याने ते राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत येथे महाग होते.

पेट्रोल 150 तर डिझेल 140 रुपये लिटर होणार? -
येणाऱ्या नव्या वर्षात पेट्रोलचा दर 150 रुपये लीटर तर डिझेलचा दर 140 रुपये लीटर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. करामधील भरमसाट वाढ आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी याचा हा परिणाम आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर सध्या प्रतिबॅरल 85 डॉलर झाले आहेत. ‘गोल्डमॅन’च्या अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत कच्चे तेल 100 डॉलरवर जाईल. पुढील वर्षी ते 110 डॉलरवर पोहोचेल. 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर सर्वाधिक 147 डॉलर प्रतिबॅरल होते. हा टप्पाही लवकरच गाठला जाऊ शकतो.

कच्च्या तेलाचे दर काहीही असले तरी केंद्र आणि राज्य सरकारे करात कपात करण्याची शक्यता नाही. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी 99 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी आहे. ती लवकरच कोविडपूर्व काळाच्या पातळीवर जाऊन 100 दशलक्ष बॅरल प्रतिदिन होईल. 

Web Title: Petrol crosses rs 121 per liter in border district of madhya pradesh and diesel price exceeds rs 110

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.