आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीमध्ये घट झाल्याचा परिणाम म्हणून आज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - नोटबंदीमुळे देशभरात लोकांचं दैनंदिन व्यवहार कोलमडल्याने गोंधळाची स्थिती आहे. या सर्व गोंधळात काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीमध्ये घट झाल्याचा परिणाम म्हणून आज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. आज मद्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल दर कपातीमुळे वाहनधारकांना तर डिझेलच्या दरकपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल प्रति लिटर 1 रुपया 46 आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 1 रुपया 53 पैशांनी घट करण्यात आली आहे.