नवी दिल्ली- सरकारी तेल कंपनी असलेली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड(IOCL)नं सिटी बँकेच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना एक खास ऑफर उपलब्ध करून दिली आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी सिटी बँकेकडून एक प्लॅटिनम कार्ड मोफत दिलं जातंय. सिटी बँकेच्या या कार्डाच्या वापरानं वर्षभरात आपण 71 लिटर पेट्रोल किंवा डिझेल मोफत मिळवू शकतो. कंपनीनं वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कार्डाचा इंडियन ऑइलच्या कोणत्याही पेट्रोल पंपावर वापर करता येणार आहे. तसेच ग्राहकांनी यादीत दिलेल्या काही ठरावीक रेस्टॉरंटमध्ये डिनर केल्यानंतर या कार्डानं पेमेंट केल्यास बिलावर 15 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सिटी बँकेच्या या कार्डावरून इंडियन ऑइलच्या अधिकृत विक्रेत्याकडून तेल विकत घेतल्यास आपल्याला 150 रुपयांच्या तेल खरेदीवर चार टर्बो पॉइंट मिळणार आहेत.सुपरमार्केटमध्ये 150 रुपयांपर्यंत सामान खरेदी केल्यानंतरही आपल्याला 02 टर्बो पॉइंट मिळणार आहेत. तर शॉपिंगवरही 150 रुपयांपर्यंतच्या खरेदीवर 1 टर्बो पॉइंट मिळणार आहे. हे टर्बो पॉइंट आपण रिडीमही करू शकता. एका टर्बो पॉइंटची किंमत 1 रुपयाएवढी आहे. टर्बो पॉइंट आपण इंडियन ऑइलच्या 1200 विक्रेत्याकडे रिडीम करता येणार आहे. या ऑफरची सर्व माहिती https://www.online.citibank.co.in/portal/newgen/cards/tab/indianoil-platinumcard.htm?eOfferCode=INCCCCTLNIOCP या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
71 लिटर पेट्रोल मिळवा मोफत, 'या' बँकेची जबरदस्त ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 9:43 AM
सरकारी तेल कंपनी असलेली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड(IOCL)नं सिटी बँकेच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना एक खास ऑफर उपलब्ध करून दिली आहे.
ठळक मुद्दे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड(IOCL)नं सिटी बँकेच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना एक खास ऑफर उपलब्ध करून दिली या ऑफरचा फायदा घेण्यासाठी सिटी बँकेकडून एक प्लॅटिनम कार्ड मोफत दिलं जातंय या कार्डाच्या वापरानं वर्षभरात आपण 71 लीटर पेट्रोल किंवा डिझेल मोफत मिळवू शकतो.