Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल अन् डिझेल पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

पेट्रोल अन् डिझेल पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

दिल्लीत डिझेलची किंमत बाजारात प्रति लिटर 73.56 रुपये होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 11:53 AM2020-09-17T11:53:51+5:302020-09-17T15:02:44+5:30

दिल्लीत डिझेलची किंमत बाजारात प्रति लिटर 73.56 रुपये होती.

petrol diesel price 17 september 2020 thursday know the rates | पेट्रोल अन् डिझेल पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

पेट्रोल अन् डिझेल पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव पुन्हा एकदा कमी केले आहेत. पेट्रोलच्या भावात 13 ते 15 पैशांची कपात केली आहे, तर डिझेलची किंमत 18 ते 20 पैशांनी खाली आली आहे. यापूर्वी 30 जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलच्या किमतीत 8.36 रुपयांची कपात केली होती, त्यामुळे दिल्लीत डिझेलची किंमत बाजारात प्रति लिटर 73.56 रुपये होती.

मोठ्या महानगरांमधील किमती जाणून घ्या
आयओसीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत खालीलप्रमाणे आहेत.

शहरडिझेलपेट्रोल
दिल्ली72.3781.40
कोलकाता 75.8782.92
मुंबई  79.0588.07
चेन्नई77.7384.44

आपल्या शहरातील पेट्रोल अन् डिझेलचे भाव जाणून घ्या
तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत कळू शकते. इंडियनऑयलच्या वेबसाइटनुसार आपल्याला आरएसपी आणि आपला शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड वेगवेगळा आहे, जो आपल्याला आयओसीएल वेबसाइटवरून मिळेल.

दररोज सहा वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर अवलंबून असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

या मानकांच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक, कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ते किरकोळ दराने पेट्रोल विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.
 

Web Title: petrol diesel price 17 september 2020 thursday know the rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.