Join us

दिलासादायक; तेल कंपन्यांनी अपडेट केले नवे दर,देशात सर्वात स्वस्त पेट्रोल ₹84.10 तर डिझेल ₹79.74 लिटर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 12:57 PM

Petrol-Diesel Price 6 August: महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केल्यानंतर, आता देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये मिळत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल मिळत होते.

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांसंदर्भात सातत्याने दिलासा मिळत आहे. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. यांत कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केल्यानंतर, आता देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये मिळत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल मिळत होते.

आज सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये लिटर तर डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोलचा हा दर तब्बल 29.39 रुपयांनी कमी आहे. तर डिझेलचा दरही 18.50 रुपयांनी कमी आहे, अर्थात स्वस्त आहे. 

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचा दर - दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये लिटरमुंबई - पेट्रोल 111.35 रुपये तर डिझेल 97.28 रुपये लिटरकोलकाता -  पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये लिटर चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये तर डिझेल 94.24 रुपये लिटरलखनौ - पेट्रोल 96.57 रुपये तर डिझेल 89.76 रुपये लिटर पटना - पेट्रोल 107.24 रुपये लिटर तर डिझेल 94.04 रुपये  भोपाल - पेट्रोल 108.65 रुपये तर डिझेल 93.90 रुपये लिटर पोर्ट ब्लेयर - पेट्रोल 84.10 रुपये तर डिझेल 79.74 रुपये लिटरपरभणी - पेट्रोल  114.42 तर डिझेल    98.78 रुपये लिटर बिक रहा है।श्रीगंगानगर - आज पेट्रोल  113.49 रुपये तर डिझेल   98.24 रुपये लिटर बिक रहा है।जयपूर - पेट्रोल  108.48 रुपये तर डिझेल  93.72 रुपये लिटर विकले जात आहे.

असा चेक करा आपल्या शहरातील दर -आपण रोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा दर एका SMS च्या माध्यमानेही चेक करू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक (IOC) RSP<डिलर कोड> लिहून 9224992249 क्रमांकावर. तसेच, एचपीसीएलचे (HPCL) ग्राहक HPPRICE <डिलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवू शकता. याच बरोब बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक RSP<डिलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर SMS पाठवू शकता. 

 

टॅग्स :पेट्रोलडिझेलमहाराष्ट्रमुंबई