Join us  

Petrol-Diesel Price : कच्च्याातेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; डिझेल आणि पेट्रोलचे नवीन दर काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 11:09 AM

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती अलीकडेच जवळपास ३ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. या पातळीवर दर स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होऊ शकते, अशी अटकळ त्यावेळी बांधली जात होती.

Petrol-Diesel Price Today : काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल अशी आशा निर्माण झाली होती. अशात इराण आणि इस्रायलमध्ये संघर्षाची ठिणगी पेटल्याने कच्च्या तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. त्यामुळे आता इंधनदर स्वस्त होण्यापेक्षा महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावर, कच्चे तेल सध्या प्रति बॅरल ७३-७४ डॉलरच्या दरम्यान आहे. कच्च्या तेलाच्या किमती अलीकडेच जवळपास ३ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. मात्र, गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत ५ डॉलरने म्हणजेच सुमारे ४२० रुपये प्रति बॅरलने महागली आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर तेल कंपन्यांनी जाहीर केले आहेत.

वायदे बाजारात कच्च्या तेलाची किंमत किती आहे?वायदे बाजारात व्यापाऱ्यांच्या मजबूत स्पॉट मागणीनंतर त्यांच्या सौद्यांचा आकार वाढवला. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती शुक्रवारी फ्युचर्स ट्रेडमध्ये ३५ रुपयांनी वाढून ६ हजार १९६ रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्या. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाच्या डिलिव्हरीचा करार 35 रुपये किंवा 0.57 टक्क्यांनी वाढून 6,196 रुपये प्रति बॅरल झाला. यामध्ये १४,४७६ लॉटसाठी व्यवहार झाला. बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या सौद्यांचा आकार वाढवल्यामुळे वायदे व्यवहारात किमतीत तेजी आली. जागतिक स्तरावर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चे तेल ०.०८ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७३.६५ डॉलरवर पोहोचले, तर ब्रेंट क्रूड ०.१२ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७७.५३ डॉलरवर व्यापार करत होते. साप्ताहिक आधारावर पाहिले तर कच्च्या तेलाची किंमत सुमारे ५ डॉलर म्हणजेच सुमारे ४२० रुपये प्रति बॅरल झाली आहे. २७ सप्टेंबर रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे ६७.६१ डॉलर होती, जी आता प्रति बॅरल ७३.६५ डॉलर झाली आहे.

मार्च महिन्यात शेवटची दरकपातमोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी १५ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली होती. त्याअंतर्गत दोन्हीच्या किमती प्रतिलिटर २ रुपयांनी कमी करण्यात आल्या. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही कपात केली होती. आता निवडणुका संपल्या असून पेट्रोल आणि डिझेलचे दर किती दिवस कमी राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शहरपेट्रोलडिझेल
दिल्ली९४.७२८७.६२
मुंबई१०४.२१९२.१५
कोलकाता१०३.९४९०.७६
चेन्नई१००.७५९२.३२
बेंगळुरू९९.८४८५.९३
लखनौ९४.६५८७.७६
नोएडा९४.८३८७.९६
चंदीगड९४.२४८२.४०

तुम्ही घरबसल्या किंमत तपासू शकतातुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरही कळू शकतात. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटवर जावे लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर तुम्ही RSP सोबत ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. तुम्ही BPCL ग्राहक असाल तर RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता.

टॅग्स :पेट्रोलडिझेलइंधन दरवाढ