Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Price: देशात ५ राज्यांचे निकाल लागले अन् पेट्रोल-डिझेलचे दर बदलले? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price: देशात ५ राज्यांचे निकाल लागले अन् पेट्रोल-डिझेलचे दर बदलले? जाणून घ्या आजचे दर

गेल्या १४ दिवसांपासून रशिया-यूक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे जागतिक परिणाम पाहायला मिळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:05 AM2022-03-11T08:05:23+5:302022-03-11T08:06:43+5:30

गेल्या १४ दिवसांपासून रशिया-यूक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे जागतिक परिणाम पाहायला मिळत आहेत.

Petrol-Diesel Price: After Election Results of 5 states in the india, Know about today's petrol-diesel rates | Petrol-Diesel Price: देशात ५ राज्यांचे निकाल लागले अन् पेट्रोल-डिझेलचे दर बदलले? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price: देशात ५ राज्यांचे निकाल लागले अन् पेट्रोल-डिझेलचे दर बदलले? जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले. या निकालात केंद्रात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने ४ राज्यात विजय मिळवला. आता इंधनाचे दरवाढ होणार अशी शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून वर्तवण्यात येत होती. इतकेच नाही तर विरोधकांनीही प्रचारात हाच मुद्दा लावून धरत भाजपावर निशाणा साधला होता. त्यामुळे निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलचे दर किती वाढतील याची चिंता सर्वसामान्य लोकांना होती.

निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या(Petrol-Diesel Rates) दरात कुठलेच बदल झाले नाही. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेल दरानुसार, दिल्लीसह विविध शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आणि निकालानंतर देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका उडेल असं बोललं जात होतं. परंतु आज असं काही चित्र दिसलं नाही. IOCL नुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रति लीटर, डिझेल ८६.६७ रुपये आहे. तर मुंबईत १०९.९८ रुपये प्रति लीटर पेट्रोल तर डिझेल ९४.१४ रुपये प्रति लीटर दर आहेत.

कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.७९ रुपये मिळत आहे. तर चेन्नईत एक लीटर पेट्रोलचे दर १०१.४० रुपये तर डिझेलची किंमत ९१.४३ रुपये प्रति लीटर आहेत. लखनौ येथे एक लीटर पेट्रोलचे दर ९५.२८ रुपये तर डिझेलचे दर ८६.८० रुपये आहेत. नोएडा येथे ९५.५१ रुपये पेट्रोल आणि ८७.०१ रुपये डिझेलचे दर आहेत. भोपाळमध्ये १०७.२३ रुपये प्रति लीटर पेट्रोल आणि डिझेल ९०.८७ रुपये प्रति लीटर दराने डिझेल विक्री होत आहे.

रशिया-यूक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले

गेल्या १४ दिवसांपासून रशिया-यूक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे जागतिक परिणाम पाहायला मिळत आहेत. देश-परदेशातील अनेक वस्तू महागल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. पुढील काळात त्याचे परिणाम भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात होऊ शकतात. याठिकाणीही इंधन दरवाढ होऊ शकते असं बोललं जात आहे. जागतिक बाजारात क्रूड ऑयल(Crude Oil) च्या किमतीवर पेट्रोल-डिझेलची किंमत दरदिवशी बदलत असते. तेल कंपन्या या दराचा आढावा घेत पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करते. इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट करत असतात.  

Read in English

Web Title: Petrol-Diesel Price: After Election Results of 5 states in the india, Know about today's petrol-diesel rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.