पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या नऊ दिवसांत तब्बल आठवेळा वाढ झाली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. दर वाढीचा वेगच एवढा भन्नाट आहे की पाडव्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात डिझेलने शतक ठोकलेले असेल. यामुळे सर्वसामान्यांची मात्र चांगलीच धुलाई होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिल्लीसह बहुतांश राज्यांच्या राजधानीत पेट्रोलच्या किमतीने १०० रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रात ते आधीपासूनच १०० पार होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलने शतक ठोकले आहे. आज पेट्रोल ८४ पैशांनी वाढून पेट्रोलचा दर 117.49 रुपये झाला आहे. तर डिझेलचा दर ८२ पैशांनी वाढून 100.12 रुपये प्रति लीटर झाला आहे. मुंबईत देखील पेट्रोल पुन्हा एकदा ११५.८८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून, डिझेलने शतक पूर्ण करत १००.१० रुपयांचा दर गाठला आहे. पुण्यात अद्याप डिझेल 98.12 रुपयांवर आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार, ऑईल डेपोपासूनच्या अंतरानुसार त्यांच्या किमती बदलतात.
सरकारने कमावले ३.३१ लाख कोटीकेंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर (२०२१) या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून ३.३१ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारने उत्पादन शुल्कात आतापर्यंत १३ वेळा वाढ केली असून, केवळ चारवेळा हे शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर चढे राहिले आहेत.निवडणुका होताच दरवाढीचा सपाटासातवेळा किमतीत वाढ : पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे विक्रमी १३७ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर, २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सातवेळा किमतीत वाढ करण्यात आली आहे.वाढता वाढता वाढे...मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे पेट्रोलचे दर १०० रुपयाच्या पुढे गेले आहेत. बहुतांश राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शतकाचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत देखील पेट्रोल पुन्हा एकदा ११५.८८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून, डिझेलने शतक पूर्ण करत १००.१० रुपयांचा दर गाठला आहे.