पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे भारतीय जनता त्रस्त झालेली असताना आता सर्वोच्च संस्था आरबीआयने (RBI) यावर केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा दबाव केंद्र सरकारवर वाढू लागला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Governor of the Reserve Bank of India Shaktikanta Das) यांनी कर घटवून किंमती ताब्यात ठेवाव्यात असा सल्ला दिला आहे. (Reduce rates of Petrol Diesel to stop inflation, RBI Governor Shaktikanta Das argue to central government. )
Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम...
भारतीय रिझर्व बँकेने (Reserve Bank of India) नुकत्याच झालेल्या एमपीसी बैठकीत दास यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी अप्रत्यक्ष कर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या जाव्यात. जेणेकरून याचा दिलासा सामान्यांना मिळेल. इंधनावरील कर हळूहळू कमी करणे गरजेचे आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवर बनत चाललेला वाढत्या किंमतींचा दबाव हटेल, असे दास म्हणाले.
Car care tips: भर उन्हातही तुमची कार ठेवा थंड; या टिप्स फॉलो करा...
MPC मिनट्समध्ये सांगण्यात आले की, डिसेंबरमध्ये सीपीआय म्हणजे ठोक महागाई दर हा खाद्य आणि इंधन हटविल्यानंतरही 5.5 टक्क्यांवर राहिला आहे. कच्च्या तेलाच्या वाढच्या किंमती आणि पेट्रोल, डिझेलवर मोठमोठे कर लावल्याने आता बाजारातील मालाच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. यामुळे महागाई वाढत आहे. यामध्ये वाहतूक आणि आरोग्य सेवादेखील महाग होत चालल्या आहेत.
Shyam Rangeela नंतर आणखी एक Video आला; पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला काय करावे सुचेना...
राज्यांवर दबाव वाढला, पण केंद्र जुमानेना...
गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालसह काही राज्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. मात्र, हे एक नाहीतर दोन रुपये एवढेच कमी केले होते. यामुळे अन्य राज्यांवर इंधनाचे दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे. परंतू केंद्र सरकार कमी करत नाही तर आम्ही का करायचे यावर ही राज्ये अडून बसली आहेत. दुसरीकडे नागालँडसारख्या छोट्या राज्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करत जनतेसाठी करोडोंच्या महसुलावर पाणी सोडले आहे.
तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. त्यानुसार गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमागड ते मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये किरकोळ पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्यावर गेले आहेत.
केंद्र जुमानेना! या राज्याने पेट्रोल 2.20 रुपयांनी अन् डिझेल 57 पैशांनी केले स्वस्त
मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 91.12 रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेलची 84.24 रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जात आहे. मुंबईत डिझेलचे दर 88.44 रुपये प्रति लिटर आहे.
FASTag problems: टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...