Join us  

Petrol, Diesel Price Hike Today: दिवसभर विश्रांती अन्! चार दिवसांत पेट्रोल, डिझेलची एकूण २.५० रुपयांची दरवाढ; आज पुन्हा वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 7:45 AM

मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वस्ताईचा पाऊस लावत एक्साईज ड्युटीमध्ये पेट्रोलला 5 रुपये आणि डिझेलला 10 रुपयांची कपात केली होती. कपातीपूर्वी हे दर पेट्रोल 117.52 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 106.55 रुपयांवर गेले होते. पुन्हा तेच दर होणार आहेत.

चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कालचा एक दिवस विश्रांती घेत आज पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या चार दिवसांत एकूण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २.५० रुपयांची वाढ झाली आहे. 

रोज ८०-८५ पैसे अशी वाढ होत असल्याने डिझेल पुन्हा शंभरी पार करेल आणि पेट्रोल पुन्हा विक्रम करणार अशी चित्रे आहेत. आणि हे विक्रम ३१ मार्चपूर्वीच होणार आहेत, एवढा प्रचंड वेग या दरवाढीने घेतलेला आहे. चार महिन्यांपूर्वी पेट्रोल, डिझेलने गाठलेले दर आता अवघ्या काही दिवसांतच पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधनाच्या दरवाढीला सुरुवात झाली असून दरवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की रुपयावर जाऊन पोहोचला आहे. चार महिन्यांपूर्वी दिवसाला २५-३० पैशांनी वाढणारे दर आज ८५ पैशांनी वाढू लागले आहेत. 

आज देखील पेट्रोलच्या दरात ८३ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात देखील ८३ पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीसोबत दिल्लीत पेट्रोल ९७.८१ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.०७ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल ११२.५१ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९६.७० रुपये प्रति लीटर झाले आहे. 

पुन्हा दरवाढ सुरु...मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वस्ताईचा पाऊस लावत एक्साईज ड्युटीमध्ये पेट्रोलला 5 रुपये आणि डिझेलला 10 रुपयांची कपात केली होती. कपातीपूर्वी हे दर पेट्रोल 117.52 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 106.55 रुपयांवर गेले होते. साठ-पासष्ठ रुपयांवर असलेले डिझेल आणि ७५-८० वर असलेले पेट्रोल पाहता पाहता शंभरी पार गेले होते. यानंतर दिवाळीचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकांसाठी सरकारने दर थेट उतरविले होते, गेले चार महिने हे दर स्थिर ठेवण्यात आले होते जे आता पुन्हा वाढू लागले आहेत.

टॅग्स :पेट्रोलडिझेलइंधन दरवाढ