तेलाच्या किमतींमध्ये रविवारी पुन्हा एकदा वाढ नोंदविण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. तुमच्या कार आणि बाईकसाठी लागणारे पेट्रोल आणि डिझेल आता विमानाच्या इंधनापेक्षाही महाग झालं आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं नवी उंची गाठली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी ३५ पैशांनी वाढ झाली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज ३५ पैशांची वाढ झाली. या वाढीसह दिल्लीत आज पेट्रोलचा दर १०५.८४ रुपये प्रतिलीटर पर्यंत पोहोचला आहे. मुंबईत तर पेट्रोलचा दर १११.७७ रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे.
सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये पेट्रोलचा दर शंभरी पारमुंबईत डिझेलचा दर १०२.५२ रुपये प्रतिलीटर आणि दिल्लीत ९४.५७ रुपये इतका झाला आहे. या वाढीसह सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पलिकडे पोहोचला आहे. तर जवळपास १२ शहरांमध्ये डिझेलचा दर शंभरी पार गेला आहे.
पेट्रोलचा दर विमानाच्या इंधनापेक्षा ३३ टक्क्यांनी अधिकपेट्रोलचा दर आता विमानाच्या इंधनापेक्षा (ATF) ३३ टक्क्यांनी अधिक झाला आहे. दिल्लीत एटीएफचा दर ७९,०२०.१६ रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच ७९ रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. दुसरीकडे राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोल ११७.८६ रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. तर डिझेलचा दर १०५.९५ रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे.
देशातील १२ राज्यांमध्ये आता डिझेलनंही गाठली शंभरीदेशातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं केव्हाच शंभरी गाठली होती. आता देशातील १२ राज्यांमध्ये डिझेलच्या दरानंही १०० चा आकडा ओलांडला आहे. यात मध्य प्रदेश, राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, बिहार, केरळ, कर्नाटक आणि लदाख या राज्यांमध्ये डिझेलचा दर १०० च्या पलिकडे पोहोचला आहे.