Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Price Today:  इंधनाचे दर 'आऊट ऑफ कंट्रोल', पाच दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ

Petrol-Diesel Price Today:  इंधनाचे दर 'आऊट ऑफ कंट्रोल', पाच दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ

Petrol-Diesel Prices Today 26 March 2022: इंधन कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 08:22 AM2022-03-26T08:22:03+5:302022-03-26T08:22:30+5:30

Petrol-Diesel Prices Today 26 March 2022: इंधन कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली. 

petrol diesel price increased by 80 paise per litre today 26 march 2022 iocl city wise petrol price diesel rate updates know more | Petrol-Diesel Price Today:  इंधनाचे दर 'आऊट ऑफ कंट्रोल', पाच दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ

Petrol-Diesel Price Today:  इंधनाचे दर 'आऊट ऑफ कंट्रोल', पाच दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ

Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022 Updates: जवळपास काही महिने स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी (Petrol-Diesel Price) पुन्हा एकदा उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. इंधन कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पाच दिवसांत तब्बल चार वेळ इंधन कंपन्यांनी ही वाढ केली. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ झाली. अशा प्रकारे पाच दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ झाली.

या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये शनिवार २६ मार्च २०२२ रोजी पेट्रोलचे दर ९८.६१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९.९७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. शनिवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८४ पैशांनी तर डिझेलचे दर ८५ पैशांनी वाढले. यानंतर  मुंबईत शनिवारी पेट्रोलचे दर ११२.५१ रुपये प्रति लिटरवरुन वाढून ११३.३५ रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेलची किंमतही ९६.७० रुपये प्रति लिटरवरून वाढऊन ९७.५५ रुपये प्रति लिटर झाले आहे. दरम्यान, दिल्ली वगळता जवळपास सर्वच प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरानं १०० रुपयांचा टप्पा गाठला आहे.


५ दिवसांत ४ वेळा वाढ
एकाच आठवड्यात ५ दिवसांत तब्बल ४ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशात २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली होती. त्यानंतर २३ मार्च रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ८० पैशांची वाढ करण्यात आली. पुन्हा एकदा २५ आणि २६ मार्च रोजी इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ करत सामान्यांना झटका दिला आहे.

Web Title: petrol diesel price increased by 80 paise per litre today 26 march 2022 iocl city wise petrol price diesel rate updates know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.