Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022 Updates: जवळपास काही महिने स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी (Petrol-Diesel Price) पुन्हा एकदा उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. इंधन कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पाच दिवसांत तब्बल चार वेळ इंधन कंपन्यांनी ही वाढ केली. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ झाली. अशा प्रकारे पाच दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ झाली.
या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये शनिवार २६ मार्च २०२२ रोजी पेट्रोलचे दर ९८.६१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९.९७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. शनिवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८४ पैशांनी तर डिझेलचे दर ८५ पैशांनी वाढले. यानंतर मुंबईत शनिवारी पेट्रोलचे दर ११२.५१ रुपये प्रति लिटरवरुन वाढून ११३.३५ रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेलची किंमतही ९६.७० रुपये प्रति लिटरवरून वाढऊन ९७.५५ रुपये प्रति लिटर झाले आहे. दरम्यान, दिल्ली वगळता जवळपास सर्वच प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरानं १०० रुपयांचा टप्पा गाठला आहे.