Join us

Petrol Diesel Price: सलग दुसऱ्या दिवशी इंधनदरवाढ; मुंबईत १०१ रुपये पेट्रोल, तर डिझेल दराचाही उच्चांक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:23 IST

Petrol Diesel Price: सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे.

मुंबई: गेल्या आठवड्यात एक दिवसाआड पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरवाढ करण्यात आली होती. आता मात्र सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. सोमवारी पेट्रोल २८ पैसे, तर डिझेल २७ पैशांनी महाग झाले आहे. वाढलेल्या दरानंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लीटर ९५.३१ रुपये, तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर १०१.५२ रुपये झाला आहे. (petrol diesel price increased today 7 june 2021 fuel price in delhi mumbai)

गेले महिनाभर सुरू असलेल्या इंधनदरवाढीमुळे ग्राहक आणि मालवाहतूकदारांचे खिशाला कात्री लागली आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०१.५२ रुपये झाला आहे. तर, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लीटर ९५.३१ रुपये झाला आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९६.७१ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये झाला आहे. काल रविवारी देशभरात पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी महागले होते.

अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ

मुंबईत डिझेल दर उच्चांकी पातळीवर!

सोमवारी झालेल्या इंधनदरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा दर ९३.९८ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा दर ८६.२२ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ९०.९२ रुपये प्रति लीटर आहे. तर, कोलकाता येथे डिझेलचा दर ८९.०७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०३.१७ रुपये असून डिझेल ९४.५० रुपये झाले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात १८ वेळा झालेल्या दरवाढीनंतर पेट्रोल ४.३६ रुपये आणि डिझेल ४.९३ रुपयांनी महागले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि लेह या ठिकाणी पेट्रोलचा भाव १०० रुपयांवर गेले असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेलव्यवसाय