नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या आहेत. मात्र, देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (price of petrol and diesel) कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. शुक्रवारी दिल्लीतपेट्रोलची किंमत 90.78 रुपये तर डिझेलची किंमत 81.10 रुपये प्रती लिटर एवढी होती. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 97.19 रुपये तर डिढेलची किंमत 88.20 रुपये प्रती लिटर होती. मात्र, यापूर्वी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. (Petrol Diesel Price latest price of petrol and diesel on 26th march)
गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरी
दोन दिवसांत दिल्लीमध्ये पेट्रोल 39 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी सस्त झाले होते. तर गेल्या महिन्यात सलग 16 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. साधारणपणे सर्वच शहरांत दोन्ही इंधनांच्या किंमती सातत्याने वाढत होत्या.
कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या -युरोपात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. गेल्या सत्रात बेंचमार्क कच्च्या तेलाच्या किंमती (Crude oil price) 4.3 टक्क्यांनी घसरल्या होत्या. ब्रेंट क्रूड (Brent crude oil) 2.79 डॉलरच्या घसरणीसह 61.62 डॉलर प्रती बॅरलवर आले होते. यूएस वेस्ट टॅक्सस इंटरमीडियएट (WTI)ची किंमतही 5.2 टक्क्यांनी घसरून 57.98 डॉलर प्रती बॅरलवर आली होती.
Petrol Diesel Price: जवळपास अर्ध्यावर येऊ शकतात पेट्रोल-डिझेलचे दर; पाहा कसे?
16 दिवसांतच 04.74 रुपयांनी महागलं होतं पेट्रोल -फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलच्या दरात सलग 16 दिवस वाढ होत होती. या 16 दिवसांत पेट्रोल 04.74 रुपयांनी महागले. मुंबईत पेट्रोल 97.57 रुपयांवर पोहोचले होते. भोपाळमध्ये एक्सपी पेट्रोल (XP Petrol) 102.12 रुपये लिटर दराने विकले जात होते.