नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या दरात सतत अस्थिरता असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोलच्या दरात अडीच महिन्यांहून अधिक काळ कोणताही बदल झालेला नाही. याआधी जुलै महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharama) यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, सरकार दर 15 दिवसांनी कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि विमान इंधनावर (ATF) लादलेल्या नवीन कराचा आढावा घेईल.
कच्च्या तेलाच्या किमती आणि अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा होती. गेल्या मे महिन्यात केंद्र सरकारने तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. गेल्या काही दिवसांत 90 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत 93.11 डॉलर प्रति बॅरल इतकी पोहोचली आहे. त्याचवेळी ब्रेंट क्रूड 100.7 डॉलर प्रति बॅरलवर दिसून आली.
यापूर्वी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर पेट्रोलवर पाच रुपये आणि डिझेलवर तीन रुपयांची कपात करून राज्यातील जनतेला दिलासा दिला होता.
आजचे दर काय आहेत?(Petrol-Diesel Price on 29th August)
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता येथे पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंडीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
तुमच्या शहरातील दर कसे तपासायचे?
पेट्रोल आणि डिझेलचे लेटेस्ट दर तपासण्यासाठी तेल कंपन्या एसएमएसद्वारे (SMS) दर तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी इंडियन ऑइलच्या (IOC) ग्राहकाला RSP <डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवावा लागेल. एचपीसीएल (HPCL) ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करा.