Join us

Petrol Diesel Price: जागतिक स्तरावर क्रूड ऑइलच्या किमतीत मोठी घट; पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:21 AM

Petrol Diesel Price: गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे असल्याचे सांगितले जात आहे.

Petrol Diesel Price: देशातील इंधनदर गगनाला भिडले आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड ०.९४ डॉलरने खाली आले असून प्रति बॅरल ८४.९८ डॉलरवर आहे. तसेच, WTI ०.३५ डॉलरने घसरुन प्रति बॅरल ७९.१३ डॉलरवर आले आहे. असे असले तरी भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे असल्याचे सांगितले जात आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आहे, तर डिझेलचा भाव ९४.२७ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये तर डिझेल ८९.६२ रुपयांवर आहे. याशिवाय कोलकाता येथे पेट्रोलचा दर प्रति लीटर १०६.०३ रुपये आहे. तर डिझेलचा दर ९२.७६ प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये आहे. तर डिझेल ९४.२४ रुपये आहे.  

दरम्यान, पुण्यात पेट्रोलचा दर १०६.१७ रुपये असून, डिझेल ९२.६८ रुपयांवर आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७६ रुपयांवर असून, डिझेलचा भाव ९३.२६ रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल १०८.७५ रुपये असून, डिझेल ९५.४५ रुपये आहे. तसेच कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०६.५६ रुपये असून, डिझेल ९३.०९ रुपयांवर आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पेट्रोलडिझेल