Join us

Petrol Diesel Price: पेट्रोल पाठोपाठ डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर; ‘या’ राज्यात सर्वाधिक दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 10:56 AM

Petrol Diesel Price: देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडल्यानंतर आता डिझेलचे दरही शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.

ठळक मुद्देपेट्रोलनंतर आता डिझेलचे दर प्रति लीटर १०० रुपयांजवळदेशात पहिल्यांदाच डिझेल शंभरी ओलांडण्याचा तयारीत दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका

मुंबई: देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडल्यानंतर आता डिझेलचे दरही शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. सलग दोन दिवस इंधनदर वाढल्यानंतर मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर देशातील एका राज्यात डिझेलचा दर ९९.२४ रुपयांवर गेला आहे. (petrol diesel price rajasthan is close to 100 rupees for diesel price in india) 

देशात पहिल्यांदाच डिझेल शंभरी ओलांडण्याचा तयारीत आहे. दरवाढीवरून आता केंद्र सरकारवर टीका होत आहे. इंधन दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने स्थानिक करात कपात करण्याची मागणी केली जात असून, दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून केंद्र सरकारने शुल्क कपात करावी अशी मागणी केली आहे. मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनदर कायम ठेवले आहेत. मुंबईत प्रति लीटर पेट्रोलचा भाव १०१.५२ रुपयांवर आहे. तर, दिल्लीत पेट्रोल ९५.३१ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९६.७१ रुपये भाव आहे. तसेच कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९५.२८ रुपये आहे. 

पै पैसा: योग्य आर्थिक सल्लागार कसा निवडाल?

डिझेलचा दर १०० रुपयांजवळ

मुंबईत डिझेलचा भाव ९३.९८ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८६.२२ रुपये आहे. चेन्नईत ९०.९२ रुपये आणि कोलकात्यात ८९.०७ रुपये डिझेलचा भाव आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल तब्बल १०६.३९ प्रति लीटर झाले असून, डिझेलचा दर ९९.२४ रुपये प्रति लीटर आहे. ४ मे २०२१ पासून आतापर्यंत २१ वेळा कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले आहेत. यात डिझेल ५.४४ रुपयांनी महागले आहे. तर पेट्रोल ४.९९ रुपयांनी महागले आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले

दरम्यान,  राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये पेट्रोलचा किरकोळ भाव १०० रुपयांवर गेला आहे. लॉकडाउनमुळे व्यवसायाला फटका बसत असून, इंधन खर्चात भरमसाठ वाढ झाल्याने मालवाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इंधनावर राज्यांकडून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धित कर आकारला जातो. राजस्थानात व्हॅटचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये व्हॅट अधिक आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अधिक आहेत.  

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेलराजस्थानकेंद्र सरकारव्यवसाय