Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Price : पेट्रोल १५० तर डिझेल १४० रुपये लिटर होणार?, कच्च्या तेलाच्या किमतवाढीचा परिणाम 

Petrol-Diesel Price : पेट्रोल १५० तर डिझेल १४० रुपये लिटर होणार?, कच्च्या तेलाच्या किमतवाढीचा परिणाम 

Petrol-Diesel Price: सध्या अनेक शहरांत पेट्रोल ११५ रुपये लिटर झाले आहे. डिझेलही १०० रुपयांच्या वर गेले आहे. जुलैमध्ये पेट्रोलचे दर प्रथमच १०० रुपयांच्या वर गेले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 08:05 AM2021-10-30T08:05:18+5:302021-10-30T08:05:38+5:30

Petrol-Diesel Price: सध्या अनेक शहरांत पेट्रोल ११५ रुपये लिटर झाले आहे. डिझेलही १०० रुपयांच्या वर गेले आहे. जुलैमध्ये पेट्रोलचे दर प्रथमच १०० रुपयांच्या वर गेले होते. 

Petrol-Diesel Price: Rs 150 per liter for petrol and Rs 140 per liter for diesel? | Petrol-Diesel Price : पेट्रोल १५० तर डिझेल १४० रुपये लिटर होणार?, कच्च्या तेलाच्या किमतवाढीचा परिणाम 

Petrol-Diesel Price : पेट्रोल १५० तर डिझेल १४० रुपये लिटर होणार?, कच्च्या तेलाच्या किमतवाढीचा परिणाम 

मुंबई : येणाऱ्या नव्या वर्षात पेट्रोलचा दर १५० रुपये लीटर तर डिझेलचा दर १४० रुपये लीटर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. करामधील भरमसाट वाढ आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी याचा हा परिणाम आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सध्या अनेक शहरांत पेट्रोल ११५ रुपये लिटर झाले आहे. डिझेलही १०० रुपयांच्या वर गेले आहे. जुलैमध्ये पेट्रोलचे दर प्रथमच १०० रुपयांच्या वर गेले होते. 
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर सध्या प्रतिबॅरल ८५ डॉलर झाले आहेत. ‘गोल्डमॅन’च्या अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत कच्चे तेल १०० डॉलरवर जाईल. पुढील वर्षी ते ११० डॉलरवर पोहोचेल. २००८ मध्ये कच्च्या तेलाचे दर सर्वाधिक १४७ डॉलर प्रतिबॅरल होते. हा टप्पाही लवकरच गाठला जाऊ शकतो.
 कच्च्या तेलाचे दर काहीही असले तरी केंद्र आणि राज्य सरकारे करात कपात करण्याची शक्यता नाही. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी ९९ दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी आहे. ती लवकरच कोविडपूर्व काळाच्या पातळीवर जाऊन १०० दशलक्ष बॅरल प्रतिदिन होईल. 
जून २०१४ मध्ये सरकारी तेल वितरण कंपन्या डिलरांना ४९ रुपये लीटरने पेट्रोल देत होत्या. डिलरचे मार्जिन आणि केंद्र व राज्यांचे कर मिळून ७४ रुपये लीटरने पेट्रोल ग्राहकांना मिळत होते. अंतिम किरकोळ किमतीत तेल कंपन्यांना ६६ टक्के, तर डिलरचे कमिशन आणि कर ३४ टक्के अशी हिस्सेदारी होती.

...तर पेट्रोल मिळाले असते ६६ रुपये दराने
 २०१४ मध्ये जे कर होते तेच आज कायम ठेवले गेले असते, तर पेट्रोल ६६ रुपये लीटर या दराने मिळाले असते. तसेच डिझेल ५५ रुपये दराने मिळाले असते. 

Web Title: Petrol-Diesel Price: Rs 150 per liter for petrol and Rs 140 per liter for diesel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.