Lokmat Money > बिझनेस न्यूज > Diesel-Petrol Price : सर्वसामान्यांना दिलासा; आज इतकी आहे, पेट्रोल-डिझेलची किंमत! 

Diesel-Petrol Price : सर्वसामान्यांना दिलासा; आज इतकी आहे, पेट्रोल-डिझेलची किंमत! 

Diesel-Petrol Price Today: ओपेक प्लसच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा असा अंदाज वर्तविला जात आहे की, भारतात इंधनाचे दर वाढू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 10:53 AM2021-01-12T10:53:09+5:302021-01-12T10:53:48+5:30

Diesel-Petrol Price Today: ओपेक प्लसच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा असा अंदाज वर्तविला जात आहे की, भारतात इंधनाचे दर वाढू शकतात.

petrol diesel price today 12 january 2021 petrol pump rate today delhi mumbai kolkata chennai | Diesel-Petrol Price : सर्वसामान्यांना दिलासा; आज इतकी आहे, पेट्रोल-डिझेलची किंमत! 

Diesel-Petrol Price : सर्वसामान्यांना दिलासा; आज इतकी आहे, पेट्रोल-डिझेलची किंमत! 

Highlightsपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ न झाल्यामुळे सध्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. जवळपास 29 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर इंधनाच्या किंमती 6 आणि 7 जानेवारीला वाढल्या होत्या. या दोन दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 49 पैसे वाढ झाली होती, तर डिझेल 51 पैशांनी महाग झाले होते. 

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ न झाल्यामुळे सध्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. ओपेक प्लसच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा असा अंदाज वर्तविला जात आहे की, भारतात इंधनाचे दर वाढू शकतात.

दररोज सहा वाजता बदलतात दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काय आहेत, या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

देशातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
>> दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये आणि डिझेल 74.38 रुपये लीटर
>> मुंबई - पेट्रोलचे दर 90.83 रुपये आणि डिझेल 81.07 रुपये लीटर
>> कोलकाता - पेट्रोल 85.68 रुपये आणि डिझेल 77.97 रुपये लीटर
>> चेन्नई - पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझेलचे दर 79.72 रुपये लीटर
>> बंगळुरु - पेट्रोल 87.04 रुपये आणि डिझेल 78.87 रुपये लीटर
>> नोएडा- पेट्रोल 84.06 रुपये आणि डिझेल 74.82 रुपये लीटर
>> गुरुग्राम- पेट्रोल 82.39 रुपये आणि डिझेल 74.97 रुपये प्रति लीटर
>> लखनऊ - पेट्रोल 83.98 रुपये आणि डिझेल 74.74 रुपये प्रति लीटर
>> पाटणा- पेट्रोल 86.75 रुपये आणि डिझेल 79.51 रुपये प्रति लीटर

अशाप्रकारे जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचे नवे दर....
देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. याशिवाय, पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही मोबाइल फोनवर SMS द्वारे तपासू शकता. यासाठी तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

Web Title: petrol diesel price today 12 january 2021 petrol pump rate today delhi mumbai kolkata chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.