पाच राज्यांचा निवडणुका संपत नाही तोच (Assembly Election) महागाईचा झटका पुन्हा बसण्य़ास सुरुवात झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Companies) आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price) वाढविले आहेत. मंगळवारीदेखील इंधनाच्या दरात वाढ झाली होती. (petrol price hike by 19 paisa, diesel price hike by 21 paisa per liter in delhi.)
गेल्या दोन महिन्य़ांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नव्हती. या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Market) चढ-उतार पहायला मिळाली होता. बुधवारी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 19 पैशांची वाढ झाली. यामुळे पेट्रोल 90.74 रुपये प्रति लीटर झाले. तसेच डिझेलच्या किंमतीत 21 पैशांची वाढ झाली. यामुळे डिझेलचे दर 81.12 रुपये प्रति लीटर वर गेले आहे.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 90.74 per litre and Rs 81.12 per litre respectively today
— ANI (@ANI) May 5, 2021
Petrol & diesel prices per litre - Rs 97.12 & Rs 88.19 in Mumbai, Rs 92.70 & Rs 86.09 in Chennai and Rs 90.92 & Rs 83.98 in Kolkata pic.twitter.com/cE6YMcPXvV
तेल वितरण कंपन्यांशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील दोन महिन्यांत भारताचा कच्च्या तेलाचा खरेदी दर 7 टक्क्यांनी वाढून प्रतिबॅरल 4874.52 रुपये झाला आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झाले नाही, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत राहतील. मागील काळातील तोटा दरवाढीच्या माध्यमातून भरून काढला जाईल.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर 27 फेब्रुवारीपासून 66 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्यात आले नव्हते. याआधीची शेवटची दरवाढ 15 एप्रिल रोजी झाली होती. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरला. त्यामुळे सध्या कंपन्यांना इंधनांच्या विक्रीवर प्रतिलिटर सुमारे 3 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महिनाभरापूर्वी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी डॉलरच्या तुलनेत विनिमय दर 72.59 रुपये होता. तो आता 74.18 रुपये झाला आहे. त्यातच कच्च्या तेलाचे दर 8 डॉलरने वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर मंगळवारी 67.64 डॉलर प्रतिबॅरल होते. भारतात वापरल्या जाणाऱ्या खनिज तेलापैकी 80 टक्के तेल आयात केले जाते.
याआधीची दरवाढ 15 एप्रिल रोजी झाली होती. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरला. त्यामुळे सध्या कंपन्यांना इंधनांच्या विक्रीवर प्रतिलिटर सुमारे 3 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच कच्च्या तेलाचे दर 8 डॉलरने वाढले आहेत. त्यामुळे ही दरवाढ अपरिहार्यच होती.