Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol, Diesel Price: खूशखबर! पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्या; तब्बल 24 दिवसांच्या स्थिरतेनंतर दर घसरले

Petrol, Diesel Price: खूशखबर! पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्या; तब्बल 24 दिवसांच्या स्थिरतेनंतर दर घसरले

Petrol, Diesel Price cut Today: पेट्रोल - डिझेलच्या दराचा दररोज घेतला जाणारा आढावा २४ दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलिटर ४ रुपये आणि डिझेलच्या विक्रीवर प्रतिलीटर २ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या 15 दिवसांत 10 टक्क्यांनी घसरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 08:38 AM2021-03-24T08:38:38+5:302021-03-24T08:39:22+5:30

Petrol, Diesel Price cut Today: पेट्रोल - डिझेलच्या दराचा दररोज घेतला जाणारा आढावा २४ दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलिटर ४ रुपये आणि डिझेलच्या विक्रीवर प्रतिलीटर २ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या 15 दिवसांत 10 टक्क्यांनी घसरले आहेत.

Petrol, Diesel Price Today: Good news! Petrol price cut by 18 paisa, diesel price fell by 17 paisa after 24 days | Petrol, Diesel Price: खूशखबर! पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्या; तब्बल 24 दिवसांच्या स्थिरतेनंतर दर घसरले

Petrol, Diesel Price: खूशखबर! पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्या; तब्बल 24 दिवसांच्या स्थिरतेनंतर दर घसरले

नवी दिल्ली :  गेल्य़ा काही दिवसांपासून इंधनाचे वाढते (Fuel Hike) दर एकाएकी बदलायचे थांबले होते. यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये (Petrol) लीटरमागे रुपये आणि डिझेलमागे (Diesel) 2 रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. आता या पार्श्वभूमीवर आज बऱ्याच दिवसांनी पेट्रोल 18 पैशांनी आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहे. जवळपास महिनाभरापासून हे दर बदलले नव्हते. (Petrol, Diesel Price cut after 24 days of constant rates in India)


मुंबईत आज पेट्रोलचा दर 97.40 रुपये झाला. कालपर्यंत हा दर 97.57 रुपये प्रति लीटर होता. तर डिझेलचा आजचा दर 88.42 रुपये प्रति लीटर झाला असून काल हा दर 88.60 रुपये प्रति लीटर होता. गेल्या महिन्यात सलग 16 दिवस पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. यामुळे देशभरात संतापाचे वातावरण होते. राजस्थानसह अन्य राज्यांच्या काही शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली होती. (All Time High) 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या 15 दिवसांत 10 टक्क्यांनी घसरले आहेत. युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यामुळे तिथे इंधनाची मागणी घटण्याची शक्यता आहे. यामुळे 71 डॉलरवर गेलेले कच्च्या तेलाचे बॅरल 64 डॉलरवर आले आहे. यामुळे ऑईल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली आहे. 

कंपन्यांना मोठा तोटा...
पेट्रोल - डिझेलच्या दराचा दररोज घेतला जाणारा आढावा २४ दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलिटर ४ रुपये आणि डिझेलच्या विक्रीवर प्रतिलीटर २ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. सुत्रांनी सांगितले की, या २० दिवसांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोलचा दर वाढून मुंबईत किमान १०३ रुपये लिटर, इतर अनेक शहरांत  १०० रुपये लीटर व्हायला हवा होता. तथापि, ही दरवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर २७ फेब्रुवारीपासून कंपन्यांनी इंधन दरवाढ रोखून धरली आहे. या काळात कच्च्या तेलाचे दर ६४.६८ डॉलर प्रतिबॅरलवरून ६६.८२ डॉलरवर गेले आहेत. मध्ये तर ते ६८.४२ डॉलर झाले होते. 

या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरून ७२,५७ वर गेला आहे. १७ फेब्रुवारी रोजी राजस्थानातील श्रीगंगानगर येथे पेट्रोल सर्वप्रथम १०० रुपये लीटर झाले होते. त्यानंतर इतरही अनेक शहरांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली होती. सर्वच राज्यात पेट्रोल ९० रुपयांच्या वर गेलेले आहे.  मात्र प्रिमिअम पेट्रोलचे दर आणखी जास्त आहेत.
 

Web Title: Petrol, Diesel Price Today: Good news! Petrol price cut by 18 paisa, diesel price fell by 17 paisa after 24 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.