Join us

रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:11 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अबकारी शुल्क, डिलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती पडलेल्या असल्या तरी देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किमती वाढत चालल्या आहेत. शनिवारी 18 जुलै रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत 80.43 रुपये प्रतिलिटरवर स्थिर आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत 17 पैशांनी वाढून 81.52 रुपये प्रति लिटर झाली आहे. दिल्लीत डिझेलची नवीन किंमत आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलल्या जातात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अबकारी शुल्क, डिलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीत टोमॅटो 10-15 रुपयांना विकला जात होता. त्याचबरोबर आता ते प्रति किलो ८०-१०० रुपयांवर गेले आहेत. इतकेच नाही तर इतर हिरव्या भाज्या आणि बटाटेदेखील त्याचप्रमाणे सुरू झाले आहेत.गुरुग्राम, गंगटोक, सिलीगुडी आणि रायपूर येथे टोमॅटो ७०-९० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे, तर गोरखपूर, कोटा आणि दिमापूरमध्ये प्रतिकिलो ८० रुपये दर आहे. आकडेवारीनुसार उत्पादक राज्यांतही हैदराबादमधील किंमत मजबूत झाली असून, ती प्रति किलो 37 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये 40 रुपये किलो आणि बंगळुरूमध्ये 46 रुपये किलो आहे.  मालवाहतुकीत वाढ झाल्यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे दर आणखी वाढल्याचं व्यापा-यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी एफएमसीजी वस्तूंच्या किमती म्हणजेच दररोजच्या वस्तू देखील महाग होऊ शकतात.डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतुकीच्या वाढीचा परिणाम संपूर्ण देशात एकाच वेळी दिसून येईल. यामुळे एफएमसीजी कंपन्यांवरील दबाव वाढेल आणि त्यांना किमती वाढविण्यास भाग पाडले जाईल. फळ आणि भाजीपाल्याच्या किमतींमध्ये वाहतुकीचा वाटा इतर वस्तूंच्या तुलनेत जास्त आहे. फळांच्या बाबतीत परिस्थिती काही वेगळी आहे. वेगवेगळ्या राज्यातून फळं दिल्लीत आणली जातात. यानंतर त्यांचे वितरण संपूर्ण देशात केले जाते. अशा परिस्थितीत मालवाहतूक वाढल्यामुळे फळांच्या किंमतींमध्ये तीव्र वाढ होऊ शकते.देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती जाणून घ्या (18 जुलै 2020 रोजी पेट्रोल किंमत)दिल्ली पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 81.52 रुपये प्रतिलीटर आहे.मुंबई पेट्रोल 87.19 रुपये आणि डिझेल 79.71 रुपये प्रतिलीटर आहे.कोलकाता पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझेल 76.67 रुपये प्रतिलीटर आहे.चेन्नई पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेल 78.50 रुपये प्रतिलीटर आहे.नोएडा पेट्रोल 81.08 रुपये आणि डिझेल 73.45 रुपये प्रतिलीटर आहे.गुरुग्राम पेट्रोल 78.64 रुपये आणि डिझेल 73.61 रुपये प्रतिलीटर आहे.लखनऊ पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 73.38 रुपये प्रतिलीटर आहे.पाटणा पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 78.40 रुपये प्रतिलीटर आहे.जयपूर पेट्रोल 87.57 रुपये आणि डिझेल 82.23 रुपये प्रति लीटर आहे.

हेही वाचा

जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...  

उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

टॅग्स :पेट्रोल पंप