Join us  

​​​​​​​Petrol- Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचे नवीन दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 7:38 AM

​​​​​​​Petrol- Diesel Price Today : राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 109.69 रुपयांना मिळत आहे. तर डिझेल 98.42 रुपये प्रतिलिटर झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे.

Petrol- Diesel price today: पेट्रोल आणि डिझेलची किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज, सोमवारी म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी आयओसीएलने जारी केलेल्या दर यादीनुसार पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 109.69 रुपयांना मिळत आहे. तर डिझेल 98.42 रुपये प्रतिलिटर झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. (Fuel prices continued to surge to record high levels on Monday, November 1, for the sixth straight day)

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 7.45 महाग झालेऑक्टोबर महिन्यात 25 दिवसांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या महिन्यात पेट्रोल 7.45 रुपयांनी 30 आणि 35 पैशांनी महागले आहे, तर डिझेल 7.90 रुपयांनी महागले आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पेट्रोल 101.89 रुपये प्रति लिटर होते तर डिझेलचे दर 90.17 रुपये प्रति लीटर होते.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशातील इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या कच्चे तेल आणखी महाग होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जाणून घ्या या चार शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 1 November 2021)>> दिल्लीत पेट्रोल 109.34 रुपये आणि डिझेल 99.07 रुपये प्रति लिटर>> मुंबईत पेट्रोल 115.50 रुपये आणि डिझेल 106.62 रुपये प्रति लिटर>> चेन्नईत पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर>> कोलकातामध्ये पेट्रोल 110.15 रुपये आणि डिझेल 101.56 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता बदलतात दरदररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भावतुम्ही एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

टॅग्स :पेट्रोलडिझेलव्यवसाय