Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल डिझेलची दरवाढ; ४ दिवसांत दीड रूपयांची वाढ, पाहा आजचे दर

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल डिझेलची दरवाढ; ४ दिवसांत दीड रूपयांची वाढ, पाहा आजचे दर

Petrol Diesel Prices Today: पेट्रोल डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात झाली दीड रूपयांची वाढ.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 07:56 AM2021-10-17T07:56:17+5:302021-10-17T07:56:39+5:30

Petrol Diesel Prices Today: पेट्रोल डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात झाली दीड रूपयांची वाढ.

petrol diesel price today prices hiked again know how much price increased petrol price | Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल डिझेलची दरवाढ; ४ दिवसांत दीड रूपयांची वाढ, पाहा आजचे दर

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल डिझेलची दरवाढ; ४ दिवसांत दीड रूपयांची वाढ, पाहा आजचे दर

Highlightsगेल्या चार दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात झाली दीड रूपयांची वाढ.

पेट्रोलडिझेलची दरवाढ (Petrol Diesel Price) थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलडिझेलचे दर रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. रविवारी १७ ऑक्टोबर रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. ऑक्टोबर महिन्याबाबत सांगायचं झालं तर काही दिवस सोडले तर इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ होऊन दर १०५.८४ रूपये प्रति लीटर या विक्रमी स्तरावर पोहोचले. तर डिझेलचे दर ९४.२२ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत.

चार प्रमुख महानगरांपैकी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दरात ३४ पैशांची वाढ होऊन ते १११.७७ रूपये प्रति लीटरवर पोहोचले. तर डिझेलमध्ये ३७ पैशांची वाढ होऊन ते १०२.५२ रूपये प्रति लीटरवर पोहोचले.

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा हा सलग चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांमध्ये इंधनाच्या दरात १.४० रूपयांची वाढ झाली. यापूर्वी १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी इंधनाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. तीन आठवड्यांमध्ये १६ वेळा पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरानं यापूर्वीच शंभरी गाठली होती, परंतु आता अनेक ठिकाणी डिझेलच्या दरानंही शंभरी गाठली आहे.

इंधनाचे नवे दर
दिल्ली:
पेट्रोल – ₹ १०५.८४  प्रति लीटर; डिझेल - ₹ ९४.५७ प्रति लीटर

मुंबई: पेट्रोल – ₹ १११.७७ प्रति लीटर; डिझेल – ₹ १०२.५२ प्रति लीटर

कोलकाता: पेट्रोल – ₹ १०६.४३ प्रति लीटर; डिझेल – ₹ ९७.६८ प्रति लीटर

चेन्नई: पेट्रोल – १०३.०१ रुपये प्रति लीटर; डिझेल – ₹ ९८.९२ प्रति लीटर

तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला SMS सेवांचाही वापर करता येऊ शकतो. यासाठी  RSP<स्पेस>पेट्रोल पंप डिलरकोड टाईप करून  9224992249 या क्रमांकावर पाठवता येऊ शकतो. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरून तुम्हाला डिलरकोड मिळवता येईलय

Web Title: petrol diesel price today prices hiked again know how much price increased petrol price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.