Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price Update: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणार मोठी कपात! जाणून घ्या केव्हा होणार घोषणा?

Petrol Diesel Price Update: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणार मोठी कपात! जाणून घ्या केव्हा होणार घोषणा?

खरे तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता सिटीग्रुपने वर्तवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 07:52 PM2022-07-06T19:52:27+5:302022-07-06T19:52:49+5:30

खरे तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता सिटीग्रुपने वर्तवली आहे.

petrol Diesel price update citigroup warns crude oil may fall to 45 Dollar a barrel by 2023 end see here details | Petrol Diesel Price Update: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणार मोठी कपात! जाणून घ्या केव्हा होणार घोषणा?

Petrol Diesel Price Update: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणार मोठी कपात! जाणून घ्या केव्हा होणार घोषणा?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईपासून आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. जगभरात इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, पण आगामी काळात भारताला आनंदाची बातमी मिळू शकते. खरे तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता सिटीग्रुपने वर्तवली आहे.

...तर कमी होईल पेट्रोल-डिझेलची किंमत -
सिटीग्रुपने म्हटल्याप्रमाणे, 2022 च्या अखेरीस कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) प्रति बॅरल 65 डॉलरपर्यंत घसरू शकते. असे झाल्यास 2023 च्या अखेरपर्यंत इंधनाची किंमत घसरून 45 डॉलर प्रति बॅरलपर्यंत येऊ शकते. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 105 डॉलर आहे. जी 58 टक्क्यांनी खाली येऊ शकते.

सिटीग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, 'जागतिक मंदीमुळे कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. खरे तर, कच्च्या तेलाच्या किमतींचा इतिहास पाहता, जागतिक अर्थव्यवस्थेवर जेव्हा जेव्हा संकट आले आहे, तेव्हा-तेव्हा कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

2008 मध्ये मंदीच्या काळात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 149 डॉलरवरून 35 डॉलरपर्यंत घसरले होते. यानंतर, कोरोना महामारीच्या काळातही जगभरातील लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 20 डॉलरपर्यंत घसरली होती. अर्थात जेव्हा-जेव्हा मंदी असते तेव्हा-तेव्हा मागणी कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट होते.

Web Title: petrol Diesel price update citigroup warns crude oil may fall to 45 Dollar a barrel by 2023 end see here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.