Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार..? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या खाली

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार..? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या खाली

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण ही भारतासाठी चांगली बातमी आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर मोठा परिणाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:50 PM2022-07-07T16:50:31+5:302022-07-07T16:50:40+5:30

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण ही भारतासाठी चांगली बातमी आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर मोठा परिणाम होतो.

Petrol-Diesel Price: Will petrol-diesel become cheaper ..? International crude oil prices are below $100 | Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार..? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या खाली

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार..? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या खाली

Petrol-Diesel Price: जागतिक मंदीच्या काळात भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण सुरूच असून आता ते प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आले आहे. सध्या कच्चे तेल तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुरुवारीही त्याची किंमत खाली आली. क्रूडच्या किमती कमी झाल्यामुळे देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली आहे.

तीन महिन्यांतील नीचांकी पातळी
बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे आता किंमत तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. गुरुवारी तेलाच्या किमती घसरल्या. याचे कारण असे की, संभाव्य जागतिक मंदीच्या भीतीने तेलाच्या मागणीबाबत चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूड LCOc1 फ्युचर्स 71 सेंटने घसरून $99.98 प्रति बॅरल झाले. WTI क्रूड CLc1 फ्युचर्स 62 सेंटने घसरून $97.91 प्रति बॅरल झाले.

उत्पादन आणि विक्रीची चिंता
मंगळवारी WTI क्रूड 8 टक्क्यांनी आणि ब्रेंट क्रूड 9 टक्क्यांनी घसरले. एसपीआय अॅसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय पार्टनर स्टीफन इन्स यांनी म्हटले की, उत्पादन आणि वापराविषयीच्या चिंता वाढल्यामुळे तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. बाजारातील स्त्रोतांवर विश्वास ठेवला तर, बुधवारच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की गेल्या आठवड्यात यूएस क्रूडचा साठा सुमारे 3.8 दशलक्ष बॅरलने वाढला आहे, तर गॅसोलीनचा साठा 1.8 दशलक्ष बॅरलने कमी झाला आहे.

याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर होताहे
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या काळात, क्रूडची किंमत 2008 च्या उच्च पातळीवर म्हणजेच प्रति बॅरल $ 139 वर पोहोचली. मात्र, त्यानंतर त्याची किंमत कमी झाली आणि आता क्रूड 100 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती एक डॉलरने वाढल्या तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 50 ते 60 पैशांनी वाढतात. त्याचप्रमाणे क्रुडच्या किमतीत घट झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कपात होण्याची शक्यता आहे.

क्रूडमुळे इंधनात वाढ
भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडचा दर महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेष म्हणजे, भारत कच्च्या तेलाचा मोठा आयातदार आहे आणि 85 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल बाहेरून खरेदी करतो. भारताला आयात कच्च्या तेलाची किंमत अमेरिकन डॉलरमध्ये मोजावी लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या मजबूतीमुळे देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर परिणाम होतो, म्हणजेच इंधन महाग होऊ लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर भारताचे आयात बिलही वाढते.

 

Web Title: Petrol-Diesel Price: Will petrol-diesel become cheaper ..? International crude oil prices are below $100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.