Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर

Crude Oil Prices: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या वृत्तामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे आज एचपीसीएल, आयओसी आणि बीपीसीएलचे शेअर्स वधारले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 04:55 PM2024-10-15T16:55:06+5:302024-10-15T16:55:06+5:30

Crude Oil Prices: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या वृत्तामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे आज एचपीसीएल, आयओसी आणि बीपीसीएलचे शेअर्स वधारले.

petrol diesel prices cut hope fades despite fall in crude oil prices ec announces maharashtra jharkhand assembly poll dates | कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर

Energy Stock Prices : इराण-इस्रायलच्या संघर्षादरम्यान भडकलेले कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा घसरले आहेत. क्रूड ऑईल प्रति बॅरल ७५ डॉलरच्या खाली आले आहे. दिवाळी काही दिवसांनर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सणासुदीत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने ही आशा धुसर झाल्याचे दिसत आहे.

ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ४.२९ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल ७४.१४ डॉलर वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड ४.५४ टक्क्यांच्या घसरणीसह ७०.४८ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील या घसरणीचा सर्वात मोठा दिलासा तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांना मिळाला आहे, त्यामुळे मंगळवार, १५ ऑक्टोबरच्या ट्रेडिंग सत्रात तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. .

HPCL-IOC शेअर्स वधारले
तिन्ही तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ ही केवळ कच्च्या तेलाच्या किमती घसरण्याशी जोडलेली नाही. तर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर करणे हे देखील शेअर्सच्या वाढीचे प्रमुख कारण आहे. वृत्तानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये १० ते १२ रुपये प्रति लिटर फायदा होत होता. अशा स्थितीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीशी कपात होण्याची शक्यता होती. पण तसे झाले नाही, त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. HPCL शेअर ४.६८ टक्क्यांच्या वाढीसह ४२४.८० रुपयांवर व्यवहार करत आहे. बीपीसीएलचे शेअर्स २.२९ टक्क्यांच्या वाढीसह ३४८ रुपयांवर होते, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे शेअर्स १.४२ टक्क्यांच्या वाढीसह १६७.७५ रुपयांवर होते.

आचार संहिता लागू
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (१५ ऑक्टोबर २०२४) महाराष्ट्र, झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी इंधनदरात कपात होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. 

या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकते, अशी बातमी अलीकडेच आली होती. त्यानंतर तिन्ही तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही कपात झाली नाही. आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने ही शक्यता तूर्तास संपुष्टात आली आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

Web Title: petrol diesel prices cut hope fades despite fall in crude oil prices ec announces maharashtra jharkhand assembly poll dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.