Join us

२७ दिवसांत २० वेळा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 9:09 AM

Petrol-diesel prices : सरकारी तेल कंपन्या आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांच्या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल १०७.९४ रुपये लीटर तर, डिझेल ९६.६७ रुपये लीटर झाले आहे.

नवी दिल्ली : बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. मागील २७ दिवसांत इंधनांच्या दरात तब्बल २० वेळा वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्या आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांच्या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल १०७.९४ रुपये लीटर तर, डिझेल ९६.६७ रुपये लीटर झाले आहे.

तत्पूर्वी, पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, वाढत्या इंधन दराबाबत आपण सौदी अरेबियासह अन्य आखाती देश आणि रशिया यांच्या पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलत आहोत.

या महिन्यात २० वेळा झालेल्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल ६.३० रुपयांनी तर, डिझेल ६.८ रुपयांनी महाग झाले आहे. १ जानेवारी २०२१ पासूनच्या दहा महिन्यांत पेट्रोल २३.९७ रुपयांनी तर, डिझेल २२.५५ रुपयांनी महाग झाले आहे.  

टॅग्स :पेट्रोलडिझेल