Join us

पेट्रोल-डिझेलमध्ये मिळणार मोठा दिलासा! ५ रुपयांपर्यंत होणार स्वस्त? ही आहेत ४ कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 7:40 PM

गेल्या काही वर्षापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत, डिझेलनी १०० रुपये गाठले आहेत, तर पेट्रोल १११ रुपयांवर आहे.

गेल्या काही वर्षापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत, डिझेलनी १०० रुपये गाठले आहेत, तर पेट्रोल १११ रुपयांवर आहे. वाहन धारकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होऊ शकते. 

आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 35 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे आणि डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किमतीत 38 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ब्रेंट आणि डब्ल्यूटीआयच्या किमती येत्या काही दिवसांत 5 डॉलरनी कमी होऊ शकतात. ब्रेंट क्रूडचे दर 82 डॉलर पर्यंत खाली येतील, यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 रुपयांची घसरण होऊ शकते.

Multibagger Stock: याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेक रिटर्न! १३₹चा शेअर १४ हजारांवर; १ लाखाचे झाले १० कोटी, घ्यावा का?

कच्च्या तेलाच्या किमतीत 35 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याचे दिसत आहे. 7 मार्च रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 139.13 डॉलर वर पोहोचली. जी सध्या प्रति बॅरल 87.81 डॉलरवर आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत प्रति बॅरल  37 डॉलरची घसरण झाल्याचे दिसत आहे. डब्लूआयटीची किंमत 7 मार्च रोजी प्रति बॅरल  130.50 डॉलरवर होती, जी प्रति बॅरल  80.41 डॉलरवर आहे. डब्लूटीआय 38 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण होऊ शकते. अमेरिकेत स्टॉक आणि शेलमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठाही वाढला असून, त्यामुळे येत्या काही दिवसांत दरात घसरण होण्याची शक्यता आहे. कोविड पुन्हा एकदा चीनमध्ये आपले पाय पसरले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा पुन्हा लागू करावा लागत आहे. त्यामुळे मागणी सातत्याने कमी होत आहे. ब्रिटनमध्ये कच्च्या तेलासाठी ड्रिलिंग वाढवणार आहेत. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता वाढली आहे, त्यामुळेही तेलांच्या मागणीत घट होणार आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेल