नवी दिल्ली - येणाऱ्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरलेली किंमत यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार आहे.
गेल्या एक महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 3 डॉलरने वाढली असतानाही गेल्या सहा दिवसांमध्ये सरकारी ऑईल कंपनीने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. अमेरिकाने इराणवर लावलेल्या बंदीमुळे 21 जूनपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सहा डॉलरने वाढली आहे. सध्या कच्च्या तेलाचा प्रति बॅरलची किंमत 39.5डॉलरवर पोहचली आहे. तेल उत्पादन करणाऱ्या करणाऱ्या प्रमुख देशांनी दररोज 10 लाख बॅरलपेक्षा आधिक तेल बाजारात उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले होते. तरीही बाजारातील आवक पूर्ण नाही होऊ शकली त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होते आहे.
याशिवाय, अमेरिकेने भारतासह सर्व देशांना 4 नोव्हेंबरपर्यंत ईराणहून कच्च्या तेलाची आयात बंद करण्यास सांगितले आहे. तसे केले नाही तर प्रतिबंध लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. तसेच, लीबिया आणि कॅनाडाहून पुरवठा कमी होण्याच्या शक्यतेनेही दर वाढले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठली नीचांकी पातळी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रुपयाची किंमत सध्या 68.63 आहे. ही रुपयाची घसरण पाहता गेल्या 19 महिन्यांतली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीमागे कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तसेच, कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.