Join us

पेट्रोल, डिझेलचे दर ८० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 1:58 AM

गेल्या १७ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ८.५ रुपये आणि १०.०१ रुपये अशी मोठी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ कायम आहे. मंगळवारी सलग १७व्या दिवशी पेट्रोलच्या दरात लिटरमागे २० पैशांनी तर डिझेलच्या दरात ५५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. राजधानीत पेट्रोलचे दर आता ८० रुपयांवर पोहोचले आहेत.इंधन कंपन्यांनी मंगळवारी इंधनाच्या दरात पुन्हा वाढ केली. पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे २० पैशांनी वाढ झाल्याने ते आता ७९.७६ रुपये असे झाले आहे. डिझेलचे दर ७८.५५ रुपयांवरून ७९.४० रुपये असे झाले आहेत. गेल्या १७ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ८.५ रुपये आणि १०.०१ रुपये अशी मोठी वाढ झाली आहे.पेट्रोल-डिझेलच्या या दराशिवाय त्याच्यावर राज्य सरकारतर्फे व्हॅट, विशेष अबकारी कर व शुल्क लावले जात असल्यामुळे ग्राहकांना अधिक दाम द्यावे लागत असते. सरकारने इंधनावरील कराचे दर कमी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.