Petrol-Diesel Price : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे. देशभरात इंधनाच्या किमतींनी सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे, तर डिझेलचे दर शंभरी गाठण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैसे प्रति लिटर वाढ झाली होती. दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.54 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईत 29 मे रोजी पेट्रोलच्या दराने पहिल्यांदाच शंभरी ओलांडली होती. तसेच गुरुवारी पेट्रोलच्या दरात वाढ होत, 107.54 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेलची किंमत 97.45 रुपये इतकी आहे. 4 मेनंतर पेट्रोलच्या दरात 40 वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 37 वेळा वाढ करण्यात आली. या दरम्यान दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 11.14 रुपये आणि डिझेलच्या किमती 9.14 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :
शहरे पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)दिल्ली 101.54 89.87मुंबई 107.54 97.45बंगळुरू 104.94 95.26चंदीगढ 97.64 89.50लखनौ 98.63 90.26पाटना 103.91 95.51जयपूर 108.40 99.02हैदराबाद 105.52 97.96गुरुग्राम 99.17 99.02गंगानगर 112.90 103.15
दरम्यान, इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्याने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब या 15 राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयांपेक्षा महाग झाले आहे. राजस्थान, ओडिशा आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.