Join us

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कमी होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 1:01 PM

Petrol-Diesel Price : सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : Petrol Price Today: वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात केली होती.

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली होती. पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना आहे आणि त्यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. बेंचमार्क ब्रेंट क्रूड (Brent crude) 6.95 टक्क्यांनी घसरून 78.89 डॉलर प्रति बॅरल झाले आहे, जे 10 दिवसांपूर्वी 84.78 डॉलर प्रति बॅरल होते.

सर्वसामान्यांना दिलासासरकारी तेल कंपन्यांनी ऑटोमोबाईल इंधनावर नफा कमावला आहे. जागतिक स्तरावर तेल बाजारातील घसरणीच्या ट्रेंडचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, गेल्या वेळी जेव्हा कोरोना संसर्ग वाढला होता, तेव्हा इंधनाच्या किमतीत घट नोंदवली गेली होती. म्हणजेच कोरोनाचा संसर्ग जसजसा वाढत असल्याचे दिसून आले, तसतशी मागणी कमी होत आहे. सध्या सामान्य नागरिकाला तेलाच्या किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

देशातील 4  शहरातील आजचे दर जाणून घ्या...शहर                पेट्रोल/प्रति लीटर              डिझेल/ प्रति लीटर दिल्ली                103.97                         86.67  मुंबई                  109.98                         94.14  चेन्नई                  101.40                         91.43 कोलकाता           104.67                         89.79 

4 नोव्हेंबरपासून इंधनाच्या किमती स्थिर भारतातील ऑटोमोटिव्ह इंधनाच्या किरकोळ किमती 4 नोव्हेंबरपासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 5 आणि 10 रुपयांची कपात केली होती. यानंतर, गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. म्हणजेच यानंतर इंधनाच्या दरात कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.

जाणकारांचे मतसध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती रोजच्या रोज बदलून सर्वसामान्यांना फायदा दिला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्लॅनिंग कमिशनमध्ये स्पेशल ड्युटीवर तैनात असलेल्या एका माजी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत असल्याने आणि त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतातील तेल विपणन कंपन्यांनीही ग्राहकांना दिलासा द्यायला हवा. खरं तर, काही महिन्यांतच, भारतात इंधनाच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाली आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेलव्यवसाय