उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका समाप्त झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढू लागल्या आहेत. गेल्या १५ दिवसांत दोन्ही इंधनदरात ९ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. ही वाढ अजून सुरूच राहणार असल्याचे संकेत आहेत. जाणून घेऊ या त्याची कारणे...
किती वाढणार किमती?- देशांतर्गत तेल उत्पादन कंपन्या ज्या इंधनाची विक्री करत आहेत, त्या विपणनातील काही एक मार्जिन राखण्यासाठी इंधनाचे दर प्रतिबॅरलमागे दर डॉलरला ५२ ते ६० पैशांनी वाढणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.- त्यातच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २८ डॉलर प्रतिबॅरल असलेले कच्चे तेल आता १०८ डॉलरपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर आणखी पाच ते सात रुपयांनी वाढण्याचे संकेत आहेत.
केंद्राचे धोरण काय?- सामान्यांवर वाढीव इंधनदराचा बोजा पडू नये, यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी कमी केली.- त्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील अनुक्रमे ५ आणि १० रुपये एक्साइज ड्युटी कमी करूनही दोन्ही इंधनांवर आकारले जाणारे केंद्रीय कर कोरोनापूर्व परिस्थितीहून अधिक आहेत.
इंधन दरवाढ आताच का?- तेल उत्पादक कंपन्यांनी १३७ दिवस दरवाढ रोखून धरली होती.- पाच राज्यांतील निवडणुका त्यासाठी कारणीभूत होत्या.- रशिया-युक्रेन तणावामुळे जगभरातच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.- जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत असताना देशात मात्र इंधनाचे दर स्थिर होते.- त्यामुळे तेल कंपन्यांची तूट वाढत होती. निवडणूक निकालांनंतर दरवाढ सुरू झाली आहे.- तूट भरून काढण्यासाठी तेल कंपन्या इंधनाचे दर दररोज वाढवत आहेत.