Petrol Diesel Price Today: ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना एकामागून एक महागाईचे चटके बसत आहेत. खाद्यतेलाच्या किमतीत २० टक्के वाढ झाली. आता पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ झाल्याने मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडत आहे, तर दुसरीकडे इंधनदर वाढल्याने मध्यमवर्गीय माणसाचा खिसा आणखी हलका होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 17 सप्टेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. त्यानुसार आज यूपी, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. त्याचबरोबर बिहारसह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. अशा स्थितीत पेट्रोल पंपावर जाऊन गाडीची टाकी भरण्याआधी तुमच्या शहरात आज पेट्रोल आणि डिझेल किती दरात उपलब्ध आहे हे जाणून घ्या.
गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारकडून पेट्रोल डिझेल दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने इंधनदरात २ रुपयांची कपात केली होती. दुसरीकडे पाकिस्तान, बांगलादेश, चीन आणि अमेरिकेपेक्षा भारतात पेट्रोलची किंमत जास्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 रुपयांच्या आसपास आहेत. सरकारचे म्हणणे आहे की जर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली राहिली तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात होऊ शकते.
देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये आणि डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 103.44 रुपये तर डिझेलचा दर 89.97 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर 104.95 रुपये आणि डिझेलचा दर 91.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये आणि डिझेलचा दर 92.34 रुपये प्रति लिटर आहे.
या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल झाले महागलं
महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 40 पैशांनी वाढ होऊन 104.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 39 पैशांनी वाढून 91.24 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर शेजारील राज्य यूपीमध्ये पेट्रोल 42 पैशांनी वाढून 94.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 48 पैशांनी वाढून 87.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
बिहारमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी
बिहारमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. बिहारमध्ये पेट्रोल 79 पैशांनी 106.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 74 पैशांनी कमी होत 93.55 रुपये प्रति लिटर होत आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मणिपूर आणि राजस्थानमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑनलाइन तपासा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) वेबसाइट: https://iocl.com/
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) वेबसाइट: https://www.bharatpetroleum.in/
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) वेबसाइट: https://www.hindustanpetroleum.com/
विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात इंधनदरात कपात होणार?
निवडणुकीचा इतिहास पाहता प्रत्येक सत्ताधारी सरकार निवडणुकीपूर्वी लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते. राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करू शकते. लोकसभेपूर्वीही देशात पेट्रोल डिझेलचे दर २ रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते.